यावल येथील सरस्वती विद्या मंदिरातील डॉ.नरेंद्र महाले यांना मिळाला राष्ट्रीय पर्यावरण योद्धा पुरस्कार.
यावल दि.१५ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल येथील सरस्वती विद्या मंदिरातील डॉ.नरेंद्र महाले यांना
राष्ट्रीय पर्यावरण योद्धा सन्मान
२०२४ पुरस्काराने धुळे येथील
नवलभाऊ कला महाविद्यालय नवलनगर ता.धुळे येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे सन्मानित करण्यात आले.
आपत्ती व्यवस्थापन या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषद नुकतीच झाली.या परिषदेमध्ये यावल येथील सरस्वती विद्यामंदिर यावलचे डॉ. नरेंद्र दिनकर महाले यांनी आपला ‘यावल तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या आपत्ती व्यवस्थापन व जबाबदारीचा तुलनात्मक अभ्यास’ या विषयावर आपला संशोधनपर पेपर सादर केला.त्यांना या अंतरराष्ट्रीय परिषदेत नॅशनल एनवोर्मेन्ट रिफॉर्म अँड प्रोटेक्शन वॉरियर,नवी दिल्ली या राष्ट्रीय स्तरावरच्या संस्थेमार्फत उत्कृष्ट सादरीकरण व पर्यावरणाच्या क्षेत्रांत आपले अमूल्य योगदान दिल्या बद्दल त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी त्यांना ‘राष्ट्रीय पर्यावरण योद्धा सन्मान २०२४ हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रा.डॉ.व्ही.एच.उभाळे यांनी सांभाळली.या कार्यक्रम प्रसंगी प्रा.शिवाजीराव बन्सीलाल पाटील,मॅनेजमेंट कौन्सिल मेंबर, प्रा. डॉ. धीरज वैष्णव, सिनेट सदस्य तसेच राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाचे प्रमुख,धुळे शाखा रूपदास सोनवणे,तसेच धुळे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख जितेंद्र सोनवणे,तसेच सुरेश शंखपाळ,पीएसआय व पालघर जिल्ह्याचे आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी विवेकानंद कदम यांची उपस्थिती होती.डॉ.नरेंद्र महाले यांच्या या राष्ट्रीय स्तरावरील सन्मानाचे व्यास प्रसादिक एज्युकेशन सोसायटीचे आधारस्तंभ रमणभाऊ देशपांडे,अध्यक्ष अरुणजी कुलकर्णी,सर्व संचालक मंडळ,मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.