Wednesday, March 26, 2025
Homeजळगावयावल येथील सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.

यावल येथील सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.

यावल येथील सरस्वती विद्या मंदिरात संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा.

यावल दि.२६ ( सुरेश पाटील ) येथील सरस्वती विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात संविधान दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

संविधान दिनाचे औचित्य साधून शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय जी.डी.कुलकर्णी सर यांनी संविधानाचीप्रत हीअत्यंत आदरानं विद्यार्थ्यांच्या समोर ठेवून या संविधानाच्या प्रतीला पुष्पअर्पण केले.प्रसंगी कार्यालयीन अधिक्षक दिपक पाटील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

संविधान दिनाचे महत्त्व व आजची स्थिती या संदर्भामध्ये ज्येष्ठ शिक्षक प्रा.एस.एम.जोशी यांनी सविस्तर असे विवेचन केले.यानंतर संविधानाबद्दल बोलताना एस.बी. चंदनकार सर यांनी संविधानाचे प्रत्येकाच्या जीवनातील महत्त्व आपल्या भाषेत विशद केले. त्याचबरोबर आपल्या अध्यक्ष भाषणामध्ये मुख्याध्यापक जी.डी. कुलकर्णी यांनी हक्क व कर्तव्य या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली.तसेच प्रसंगी संविधानाची प्रास्ताविका ही सर्वांनी सामूहिक रित्या म्हटली.संविधान दिनाच्या निमित्ताने डॉ.नरेंद्र महाले यांनी संविधानातील कलम घटनादुरुस्ती व त्याचबरोबर शैक्षणिक दृष्टिकोनातून संविधानातील कलम किती उपयोगाचे आहे याचे विवेचन केले.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बी.पी.वैद्य सर यांनी केले तर सूत्रसंचालन एन.डी.भारुडे सर यांनी केले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या