Thursday, March 27, 2025
Homeजळगावयावल येथील साने गुरुजी विद्यालया जवळील दुःखद घटना.

यावल येथील साने गुरुजी विद्यालया जवळील दुःखद घटना.

घरात सर्पदंश झाल्याने ५६ वर्षीय महिलेचा मृत्यू.

यावल येथील साने गुरुजी विद्यालया जवळील दुःखद घटना.

यावल दि.२२ ( खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
येथील शहरातील गाडगेनगर भागात राहणाऱ्या एका महीलेला तिच्या घरात विषारी सापाने दंश केल्याने तिचा मृत्यु झाल्याची दुःखद आज रविवार दि. 22 रोजी घटना घडली. याबाबत यावल पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की येथील यावल नगरपरिषद संचलित साने गुरुजी माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या पाठी मागील गाडगेनगर वस्तीत राहणारी निर्मलाबाई शंकर वडर वय ५६ वर्ष यांना आज सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास त्यांच्या घरातच त्यांच्या उजव्या पायाच्या अंगठ्याच्या मध्यभागी विषारी सापाने दंश केला असता त्या तात्काळ बेशुद्ध पडत्यात कुंटूबातील मंडळीच्या लक्षात ही बाब आल्याने
त्यांना रहिवाशांनी तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असतांना डॉ.प्रशांत जावळे यांनी तपासणी करून सर्पदंश झालेल्या निर्मलाबाई वडर यांना मृत झाली असल्याची सांगितले.मयत निर्मलाबाई वडर यांच्यावर यावल ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले.या घटनेची खबर मयत महिलेच्या मुलगा रवीन्द्र शंकर वडर वय ३० यांने यावल पोलीस स्टेशनला दिल्यावरून अकस्मात मृत्यूची
नोंद करण्यात आली असुन पुढील तपास पोलीस निरिक्षक प्रदीप ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.राजेन्द्र पवार हे करीत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या