यावल येशील जे.टी.महाजन इंग्लिश स्कूल यावल मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी.
यावल दि.१९ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी यावल येथील किती महाजन इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाप्रसंगी कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्य सौ. रंजना महाजन मॅडम व इंग्रजी शाळेच्या प्राचार्य यांनी उपस्थिती दिली. सिमी माध्यमच्या पर्यवेक्षिका लोखंडे मॅडम व इंग्लिश माध्यमाच्या पर्यवेक्षिका गौरी गिरूड मॅडम यांनी देखील उपस्थितो दिली.मान्यवर व अध्यक्ष यांच्या हातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुजन करून दिप प्रज्वलन करण्यात आले.
यानंतर इयत्ता ९ वी सेमी चा विदयार्थी प्रणव पाटील यांने शिवगर्जना फरून सर्वांमध्ये नव चैतन्य निर्माण केले. त्याच बरोबर ५ वी सेमी माध्यमाच्या विदयार्थीनीनी शिवरायांची आरती गायली
यानंतर शाळेतील शिक्षिका इशा इंगळे मॅडम यांनी छत्रपति शिवरायांबद्दल विदयार्थ्यांना माहिती दीली.शाळेतील विदयार्थांचे देखिल यानंतर भाषणे झाली.कार्यक्रमामध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी इंग्लिश माध्यमाच्या इयता ६ वी, नवी व १ वी तील विदयार्थानींनी शिवाजी महाराजांची माहीती सांगणारे नृत्य आदर केले हया कार्यक्रमाची रूपरेषा पर्यवेक्षिका श्रीमती राजश्री लोखंडे मॅम गौरी भिरुड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आखली गेली.हया कार्यक्रमाचे सुत्रसंचलन लक्ष्मी कवडीवाले यांनी केले. तसेच आभार प्रदर्श गायत्री चौधरी मॅडम यांनी केले
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे अनमोल सह सहकार्य लाभले.अशा रितीने शिवजन्मोत्सव शाळेत उत्साहात पार पडला.