Wednesday, March 26, 2025
Homeजळगावयावल शहरात अल्पवयीन बच्चा गॅंग / संघटन परंतु जातीय सलोखा धोक्यात.

यावल शहरात अल्पवयीन बच्चा गॅंग / संघटन परंतु जातीय सलोखा धोक्यात.

यावल शहरात अल्पवयीन बच्चा गॅंग / संघटन परंतु जातीय सलोखा धोक्यात.

यावल दि.२३  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी  यावल शहरात अल्पवयीन लहान बालकांची बच्चा गॅंग आक्रमक झाली असून संघटन कौतुकास्पद असले तरी कायदा सुव्यवस्था दृष्टिकोनातून जातीय सलोखा मात्र धोक्यात आला आहे याकडे पोलीस दलाने,शासनाने,लोकप्रतिनिधींनी सर्व समाज हिताच्या दृष्टिकोनातून वेळीच लक्ष घातल्यास यावल शहराची शांतता,जातीय सलोखा, व कायदा सुव्यवस्था अबाधित राहील अशी चर्चा संपूर्ण यावल शहरात आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की यावल शहरात एका ठिकाणी अल्पवयीन लहान मुलांची गॅंग संघटन रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या इतर लहान मुलांना रस्त्यात अडवून मारहाण करीत आम्ही म्हणून तसेच तुम्ही पण म्हणा नाही म्हटल्यास मारहाण करीत असल्याच्या गंभीर स्वरूपाच्या तक्रारी यावल पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचल्या आहेत परंतु यात आता काही लोकप्रतिनिधी व संबंधित नेहमीप्रमाणे आप- आपले मतभेद विचार मांडून शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी बच्चा गॅंग अल्पवयीन मुलांची गॅंग संघटन मात्र यावल शहराच्या कायदा सुव्यवस्था,जातीय सलोखा दृष्टिकोनातून घातक ठरणार असल्याचे सुज्ञ जाणकार, समाजसेवकांमध्ये बोलले जात आहे.तरी याकडे पोलीस दलाने आपले लक्ष केंद्रित करून जातीय सलोखा,कायदा सुव्यवस्था टिकून राहण्यासाठी योग्य त्या नोंदी घेऊन कारवाई करावी अशी चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरू झाली आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या