यावल शहरात आवाज कोणाचा..?
धर्मांधांनी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे मिरवणुकीला केला विरोध.
यावल दि.१८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
काल सोमवार दि.१७ मार्च २०२४ रोजी संध्याकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने भव्य अशी मिरवणूक यावल येथील भारतीय स्टेट बँके जवळील शनिदेव मंदिरापासून यावल पोलीस स्टेशन समोरून येताना आणि पोलीस बंदोबस्त असताना बुरुज चौकाजवळ आणि शहरातील मेन रोडवर महाजन टी डेपोजवळ काही धर्मांधानी अतिशय चुकीच्या पद्धतीने घोषणाबाजी करून मिरवणुकीला विरोध केल्याने यावल शहरात नेमका आवाज कोणाचा जास्त आहे..? आणि कोणाला विरोध केला जात आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेरे यांच्या माध्यमातून चौकशी करून या समाज विघातक धर्मांधावर कारवाई करावी अशी सर्व स्तरातून मागणी होत आहे.
अवैध भोंगे ताबडतोब हटवा मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला असल्याचे वृत्त सर्व प्रसिद्धी माध्यमातून नुकतेच पाच दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाल्याने याचे वाईट वाटून यावल शहरात मात्र आवाज जास्त असताना काल सोमवार दि.१७ मार्च २०२४ संध्याकाळी यावल शहरात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीला म्हणजे जात धर्म याला विरोध करून जातीय दंगल घडविण्याचा प्रयत्न शहरातील काही समाजकंटकांनी आपल्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून घडवून आणण्याचा प्रयत्न केला याबाबत यावल शहरात मात्र जास्त आवाज कोणाचा आणि प्रत्यक्षात कोणाला त्रास दिला जात आहे याबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून यावल पोलिसांनी कोणाचा आवाज जास्त आहे यावर कारवाई नाही केल्यास अधिकारी मोठ्या प्रमाणात अडचणीत येणार असल्याचे राजकारणात समाजात बोलले जात आहे काल यावल शहरात घडलेल्या घटनेबाबत समाजात ते ठराविक चिथावणीखोर कोण आहेत, आणि घोषणाबाजी करणारे कोण होते त्यांचा शोध सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून यावल पोलिसांनी घेऊन यांच्या आवाज कमी कसा होईल याबाबत कायदेशीर कारवाई करावी.यावल शहरात काही ठराविक तरुणांना पुढे करून सार्वजनिक मिरवणुकीला विरोध केल्यानंतर शांतता प्रस्थापित करण्याच्या नावाखाली चुकीच्या घोषणा करणाऱ्यांना समजूत घालून शासनाची समाजाची दिशाभूल कोण करीत आहे याची सखोल गोपनीय चौकशी यावल पोलिसांनी केल्यास, आणि यांच्या बेकायदा आवाजावर नियंत्रण आणल्यास यापुढे अशा प्रकार यावल शहरात घडणार नाही. असे सर्व स्तरातून बोलले जात असल्याने तरी लोकप्रतिनिधींनी वेळीच याबाबत ठोस निर्णय घेणे बाबत कार्यवाही करावी सर्व स्तरात चर्चा आहे.
याबाबत यावल शहरात काल संध्याकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मिरवणूकिला अज्ञात समाजकंटकांनी चुकीच्या पद्धतीने केलेल्या घोषणाबाजी बाबत कोणी काही तक्रार दिली आहे किंवा नाही, स्टेशन काही नोंद केली आहे का..? गुन्हा दाखल आहे का..? याबाबत ठाणे अंमलदार यांना आज दिनांक १८ रोजी दुपारी ४ वाजता दूरध्वनीवरून विचारणा केली असता अद्याप काहीही दाखल नसल्याचे सांगितले.