यावल शहरात भर दिवसा १० ते ११ वाजेच्या दरम्यान बंद घरात प्रवेश करून दोन ते अडीच लाख रुपयांची चोरी.
किर्तन सप्ताहात गेल्याचे निमित्त साधून चोरट्यांनी केली हात की सफाई.
यावल दि.३. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल शहरात पूर्णवादनगर मधील पारनेरकर महाराज मंदिराजवळ रहिवाशी असलेल्या पंकज अमृत बारी यांची आई आज सकाळी १० वाजता भजन कीर्तन सप्ताहात गेल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घरात अनधिकृत प्रवेश करून घरातील सामानाची कपाटाची तोडफोड करीत सामान फेकाफेक करून शोध घेऊन सव्वा लाख रुपयाची रोख रक्कम व अंदाजे दीड ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेल्याची तक्रार यावल पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली यामुळे संपूर्ण यावल शहरात मोठी खळबळ उडाली.
यावर शहर पोलिसांचा कारवाईचा देखावा..?
यावल शहर पोलीस परीक्षा केंद्रावर गर्दी करीत मनमानी पद्धतीने आपला बंदोबस्त करीत फक्त पोलीस स्टेशन समोरील झेरॉक्स दुकाने बंद ठेवण्याचा कांगावा करून इतर ठिकाणच्या झेरॉक्स दुकानदारांना अभय देत असल्याने, पोलिसांच्या इतर कामकाजावर विपरीत परिणाम झालेला दिसून येत आहे तसेच इतर अनेक ठिकाणी झेरॉक्स दुकाने खुलेआम सुरू आहेत.झेरॉक्स प्रत काढण्यासाठी एक रुपया दोन रुपये प्रति दर असताना झेरॉक्स दुकानदार परीक्षार्थींचा मजबुरीचा फायदा घेत ५० ते १०० रुपये प्रति झेरॉक्स काढून झेरॉक्स करणाऱ्यांची लूट करीत आहे त्याचप्रमाणे भुरटे चोर शहरात खुलेआम फिरत कोण कुठे, गावात किंवा बाहेर गावात गेले याची झाडा — झडती करीत संधी साधून चोऱ्या करीत आहेत.काही किरकोळ व्यवसाय आपल्या फिरत्या उद्योगधंद्याच्या नावाखाली छोट्या-मोठ्या वाहनांवर कर्कश आवाजाचे स्पीकर लावून काही वस्तूंची विक्री करतात त्यात सुद्धा गावातील माहिती गोळा करून संधी साधून अज्ञात अज्ञात चोरटे हात सफाई करीत आहे.याकडे यावल पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर यांनी लक्ष केंद्रित करून आपल्या पोलीस दला मार्फत कडक कारवाई करावी अशी यावल शहरात चर्चा आहे.