यावल शहरात हनुमान जयंती, बालाजी रथोत्सव आणि खंडेराव महाराजांच्या बारा गाड्या मोठ्या उत्साहात.
तालुक्यात ढगाळ वातावरण नैसर्गिक नुकसान कुठेही नाही.
यावल दि.१२ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
यावल येथे सुमारे १२५ वर्षाचा पूर्व इतिहास लाभलेला येथील बालाजी महाराजांचा रथोत्सव चैत्रशुद्ध पौर्णिमा तथा हनुमान जयंतीच्या दिवशी साजरा होत असतो याच दिवशी संध्याकाळी चोपडा रोडवर श्री खंडेराव महाराजांच्या १२ गाड्या मोठ्या उत्साहात ओढल्या जातात अशा या त्रिवेणी संगमयुक्त कार्यक्रमाचा लाभ संपूर्ण पंचक्रोशीतील सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून घेत असतात यासाठी पोलीस व होमगार्ड बंदोबस्त चोख प्रमाणात ठेवला जातो आणि आहे.
आज शनिवार दि.१२ एप्रिल २०२५ रोजी संध्याकाळी पाच वाजेपासून निसर्गाने आपला रंग बदलविले आणि मोठे वारा वादळ पाऊस
येणार का..? याकडे संपूर्ण यावल शहरासह तालुक्याचे लक्ष वेधून होते परंतु यावल तालुक्यात श्री बालाजी महाराज व पवनपुत्र हनुमान यांच्या कृपाशीर्वादाने नैसर्गिक आपत्तीने कोणतेही प्रकारचे नुकसान झाले नाही हे विशेष.
शहरात आज सकाळी श्री हनुमान जयंतीचा कार्यक्रम ठिकठिकाणीच्या अनुमान मंदिरात मोठ्या उत्साहात आणि आनंदात शांततेत पार पडला त्यानंतर संध्याकाळी सहा वाजेच्या सुमारास बालाजी महाराजांचा रथोत्सव कार्यक्रम, खंडेराव महाराजांच्या बारा गाड्या कार्यक्रम संपन्न झाला यासोबत बालाजी महाराजांचा रथोत्सव यात्रेस सुद्धा सुरुवात झाली रतसो यात्रेचा समारोप उद्या सकाळपर्यंत होणार आहे यासाठी पोलीस होमगार्ड बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे.