युवकाने विष प्राशन करुन संपविले आयुष्य !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील वाकडी येथे सुनील वामन पाटील (वय ४०) या तरुणाने विष प्राशन करुन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तालुक्यातील वाकडी येथे सुनील पाटील हे वास्तव्यास होते. त्यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास विष प्राशन केल्याचे लक्षात आल्यानंतर त्याला साडे चार वाजता शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला. सुनील याच्या पश्चात पत्नी व मुलं असा परिवार आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार संजिव मोरे करीत आहेत