रन फार वरणगांव स्पर्धेमधे ज्येष्ठांसह पाचशेच्यावर धावपटू धावले;
विजेत्यांनी पटकाविली पारितोषिके
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
वरणगांव : येथे राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सिव्हील सोसायटीच्या वतीने आयोजित रन फॉर वरणगाव स्पर्धेला स्पर्धकांनी प्रचंड प्रतिसाद देत जळगांव जिह्यासह इतर जिल्ह्यातील पाचशेच्यावर धावपटूंनी सहभाग घेतला . विविध गटात या स्पर्धा दि .१श् डिसेंबर रविवार रोजी पार पडल्या .
माझे शहर माझी जबाबदारी याचे भान ठेवून आपले आरोग्य सुदृढ व तंदुरुस्त राहावे यासाठी सिव्हील सोसायटी तर्फे दरवर्षी धावण्याच्या स्पर्धेचे
आयोजन करण्यात येते . त्याचाच भाग म्हणून
यावर्षी सुध्दा स्पर्धा घेण्यात आल्या. फुलगाव उड्डान पुलाजवळील मैदानावर स्पर्धेचे उदघाटन ऑयकॉन विजय फिरके, सपोनि जनार्दन खंडेराव व सोसायटीचे पदाधिकारी यांच्या हस्ते राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन व अभिवादन करुन हिरवी झंडी दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली .
त्यात सोळा वर्षा खालील मुलांच्या गटात ५ किमी रन मध्ये
प्रथम क्रमांक ईशांत पांडे ,द्वितीय क्रमांक करण कोळी व मुलींच्या गटात प्रथम क्रमांक जान्हवी सपकाळे द्वितीय क्रमांक साक्षी महाजन विजयी झाले तर १६ ते ३५ वर्ष वयोगटात मुले ५ कि मी रन साठीचे बक्षीस विभागून देण्यात आले त्यात प्रथम क्रमांक जयपाल पावरा व आयान खान
द्वितीय क्रमांक रोहित कदम ,
सोळा ते ३५ वर्ष वयोगटात मुली ५ कि .मी रन प्रथम क्रमांक ममता खंडाळे द्वितीय क्रमांक पौर्णिमा सोनवणे सोळा ते ३५ वर्ष वयोगटात मुल १० किमी रन प्रथम क्रमांक वैभव बोराडे द्वितीय क्रमांक महेश बारी तर मुलींमधे प्रथम क्रमांक जान्हवी रोझोदे ,द्वितीय क्रमांक तेजस्विनी ढाके ३५ वर्षवरील वयोगटात पुरुष ५ किमी रन साठी प्रथम क्रमांक डॅनियल पवार ,द्वितीय क्रमांक अब्रार पटेल तर महिलामधे प्रथम क्रमांक गुंजन गुप्ता ,द्वितीय क्रमांक अरुणा पाटील ३५ वर्ष वरील वयोगटात पुरुष १० किमी रन साठी प्रथम क्रमांक अर्जुन साळवे ,द्वितीय क्रमांक श्रीकृष्ण धारपवार तर महिलांमधे प्रथम क्रमांक सीमा पाटील ,द्वितीय क्रमांक रीना परदेशी अशा प्रकारे स्पर्धक विजयी झाले त्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिस व प्रमाणपत्र देण्यात आले आहे .
मॅरेथान परिक्षक म्हणून गणेश बोदडे , सचिन चौधरी , सचिन भोळे ‘एल एन भंगाले रामचंद्र पाटिल, प्रतिभा तावड़े हेमराज मेटकर, सुनीता कापसे श्रीकांत माळी ज्ञानेश्वर पाटिल यांनी काम पाहिले स्पर्धा यशस्वीते साठी डॉ . भोईटे , डॉ .अनिल शिंदे , अजय पाटील , कमलेश येवले ,राहुल सोनवणे गोपाळ गावंडे सचिन बेलोकार दीपक सोनार, हेमंत पाटील , अक्षय भावसार, रामचंद्र पाटील, श्रद्धा चौधरी , नंदिनी माळी सोनाली पाटील आदींनी परिश्रम घेतले .