Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हारविवार रात्रीच्या सुमारास शहरात हाणामारीची घटना : ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

रविवार रात्रीच्या सुमारास शहरात हाणामारीची घटना : ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

रविवार रात्रीच्या सुमारास शहरात हाणामारीची घटना : ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील लालमाती येथे रविवारी रात्री हाणामारीची घटना घडली. या प्रकरणी एका गटातील ११ जणांविरुद्ध रावेर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, ही घटना १२ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास घडली. मुस्तफा शित्र तडवी याने चिथावणी देऊन शिवीगाळ केली. त्यामुळे रमेश नारायण पवार (४४) हे त्यांना याबाबत विचारणा करण्यास गेले असता शिवीगाळ करण्यात आली. याचबरोबर धमकी देत लाठ्या काठ्यांनी मारहाण केली. तर सोडवण्यासाठी गेलेल्या एकाला लाठ्या काठ्यांनी मारहाण करून जखमी केले.याप्रकरणी रमेश नारायण पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिकंदर शित्र तडवी, शब्बीर उर्फ चंवा शित्र तडवी, मुस्तफा शित्र तडवी, हसन जहात तडवी, हुसेन जहात तडवी, कालु सिकंदर तडवी, राजू सिकंदर तडवी, रमजान गुलशेर तडवी, न्याजुद्दीन नजीर तडवी, अस्लम कलिंदर तडवी, सद्दाम मुस्तफा तडवी (सर्व रा. लालमाती ता. रावेर) या ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, पोलिस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार पाटील हे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या