रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून पाण्यात बसून रस्ता रोको आंदोलन !
लवकर कामे मार्गी न लावल्यास दिवाळीच्या दिवशी आंदोलन करणार – माजी नगराध्यक्ष सुनील काळे*
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वरणगाव शहरा जवळील तीर्थक्षेत्र नागेश्वर महादेव मंदिराजवळी ल रेल्वे पुलाच्या खाली पाणी साचत असल्याने तिथे रस्ता खराब झाला आहे नागरिकांना भक्तांना सांगता सुद्धा येत नाही त्याकरता आज रेल्वे पुलाखालील पाणी काढण्यात यावे व रस्ता दुरुस्त करण्यात यावा तसेच तिरंगा सर्कल ते रेल्वे स्टेशन पर्यंत उर्वरित दुभाजकाचे काम करण्यात येऊन मध्यभागी लाईट टाकण्यात यावे सिद्धेश्वर नगर येथील जाण्यासाठी अंतर्गत अंडर बायपास करण्यात यावा बोदवड कडे जाण्यासाठी उड्डाणपूल करण्यात यावा या मागणीसाठी वरणगावचे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले.व लवकर कामे मार्गी न लावल्यास दिवाळीच्या दिवशी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी उपनगराध्यक्ष शेख आकलाख भाजपाचे अध्यक्ष सुनील माळी मिलिंद भैसे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी सरचिटणीस योगेश माळी शहराध्यक्ष आकाश निमकर ग्राहक संघटनेचे अध्यक्ष हितेश चौधरी तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर कृष्णा महाजन बळीराम सोनवणे नामदेव सोनवणे पेहलवान ऋषिकेश महाजन यांचेसह शेकडो लोकांनीसाचलेल्या पाण्यात बसून आंदोलन केले या आंदोलना त विद्यार्थी महिला शेतकरी बांधवांची उपस्थिती होती. दोन तास चाललेल्या रस्ता रोको आंदोलनात सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपकार्यकारी अभियंता श्री सी के तायडे यांनी स्वतः भेट देऊन सदरचा रेल्वे पुलाखालील साचत असलेले पाणी व रस्ता आठ दिवसात दुरुस्त करून देतो तसेच तिरंगा सर्कलत रेल्वे स्टेशन पर्यंत उर्वरित दुभाजकाचे काम व लाईट टाकण्याचे काम दहा दिवसात करून देतो असे लेखी आश्वासन दिले त्यावेळी आपण रस्ता रोको आंदोलन मागे घ्यावा अशी विनंती केली त्यानुसार आंदोलन मागे घेण्यात आले . यावेळी वाहनांची प्रचंड गर्दी जमली होती यावेळी रस्ते रेल्वे पुलाखालील पाणी निघालेच पाहिजे व तिरंगा सर्कल ते रेल्वे स्टेशन उर्वरित दुभाजकाचे काम करून मध्यभागी दिवाळीत लाईट लागलेच लागले पाहिजे अशा प्रकारे घोषणा देऊन वातावरण तणाव होऊन तापले गेले होते यावेळी पोलिसांनी प्रचंड बंदोबस्त ठेवला यावेळी पोलीस स्टेशनचे श्री पीएसआय प्रशांत सोनवणे पोलीस श्रावण जवरे बाविस्कर यांच्यासह प्रवासी संघटनेचे मुस्लिम भाई अन्सारी डॉक्टर सादिक शेख अजमल ‘ शे .फजल पिंपळगाव सरंपच’लक्ष्मण पाटील ऋषिकेश महाजन निलेश पाटील यांच्यासह माजी प्राचार्य के एम पाटील सर दत्तात्रय सूर्यवंशी उपस्थित होते.