रस्त्यावर लघवी करीत असल्याचा राग आल्याने चौघांनी केली लाकडी बॉटमने मारहाण
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – रस्त्यावर लघवी करीत असल्याचा राग आल्याने चौघांनी आकाश गोकुळ पारे (वय ३०, रा. तुकारामवाडी) याला लाकडी बॉटमने मारहाण करुन जखमी केले. ही घटना दि. १ रोजी दुपारच्या सुमारास एमएसईबी ऑफिसच्या मुख्य रस्त्यावर घडली. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, जळगाव शहरातील तुकारामवाडी परिसरात आकाश पारे हा तरुण वास्तव्यास आहे. दि. १ रोजी दिक्षीत वाडी परिसरातील एमएसईबी ऑफिसच्या मुख्य रस्त्यावर पारे हा तेथून जात होता. त्याठिकाणी ते रस्त्यावर लघवी करीत असतांना राधे सोनवणे व राहुल गंजे उर्फ पिंट्या यांनी त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या हातातील लाकडी बॉटमने त्यांच्या डोक्यावर मार करुन गंभीर जखमी केले. यावेळी राधे सोनवणे याची आई व पिंट्याची बायको त्याठिकाणी येवून त्यांनी आकाशला धरुन लावले. त्यानंतर राहूल गंजे याने त्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी पारे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि संतोष चव्हाण करीत आहे.