..रहिवाशांना जुगार, पत्ता खेळण्याची सवय का लावतो? विचारल्याने दोघांनी केली जबर मारहाण !
जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रातिनिधी – आपल्या परिसरातील रहिवाशांना जुगार, पत्ता खेळण्याची सवय का लावतो? अशी विचारणा करणाऱ्या अजित वसंतलाल वलभानी (३८, रा. सिंधी कॉलनी) यांना दोन जणांनी मारहाण केली. ही घटना २७ सप्टेंबर रोजी, सिंधी कॉलनीत घडली.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, २८ सप्टेंबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजित वलभानी यांनी परिसरात राहणाऱ्या यश रामचंद्राणी याला बोलविले व तू आपल्या परिसरातील रहिवाशांना जुगार, पत्ता खेळण्याची सवय का लावतो, असे विचारले. याचा राग आल्याने यश रामचंद्राणी व त्यांच्या सोबत असलेल्या यश अग्रवाल या दोघांनी शिवीगाळ करत लोखंडी रॉडने मारहाण केली. यात वलभानी हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.याप्रकरणी २८ सप्टेंबर रोजी अजित वलभानी यांच्या फिर्यादीवरून यश रामचंद्राणी आणि यश अग्रवाल (दोन्ही रा. सिंधी कॉलनी) या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे करीत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला आहे.