राजकीय पक्षांनी अपंगांचा / दिव्यांगांचा अपमान केल्यास शिक्षेसह दंडाची तरतूद!
भारतीय निवडणूक आयोगाने सूचना दिल्या पोलीस विभागाला.
यावल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – राजकीय पक्षांनी अपंगांचा तथा दिव्यांगाचा अपमान केल्यास शिक्षेस व दंडाची तरतूद आहे अशा सूचना भारतीय निवडणूक आयोगाने पोलीस विभागाला दिल्या आहेत.
याबाबतची माहिती अशी की, वेडा,वेडामूकबधिर,आंधळा, एक डोळा,बहिरा,लंगडा इत्यादी अपंग लोकांचा अपमान करणारे शब्द राजकीय पक्षांना अडचणीत आणू शकतात. राजकीय पक्षांनी त्यांच्या संपर्कात दिव्यांगांकडे विशेष लक्ष द्यावे,अशा सूचना भारतीय निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिल्या आहेत.काळजी घेण्याच्या सूचना दिल्या तसेच अपंग व्यक्तींचे हक्क अधिनियम २०१६ मधील शिक्षेची तरतूद आपण दिली, या कायद्यांनतर्गत ६ महिने ते ५ वर्षा पर्यंत शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे.