राजोरे जि प प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा उत्साहात साजरा.
यावल दि.११ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
तालुक्यातील राजोरा येथील जि.प.प्राथमीक मराठी शाळेमध्ये बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.सदर मेळाव्याचे उद्घाटन सरपंच पुष्पाताई पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
ग्रा.प.सदस्य सुवर्णा महाजन, पोलीस पाटील मुक्ताताई गोसावी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष योगिता पाटील,पालक सदस्य पूजा पाटील,अर्चना बोरोले उपस्थित होते
बाल आनंद मेळाव्यामध्ये इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे २५ स्टॉल लावण्यात आलेले होते.
विद्यार्थ्यांमध्ये विक्री कौशल्य व व्यवहार ज्ञान विकसित व्हावे यासाठी या मेळाव्याचे आयोजन केल्याचे मुख्याध्यापक रंजना सोनवणे मॅडम यांनी सांगितले
उपशिक्षिका संध्या सोनवणे व वैशाली पाटील व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर मेळाव्यासाठी विद्यार्थ्यांनी स्वयंपूर्ण पदार्थ विक्रीस ठेवले व काहींनी स्वतः बनवलेले होते.