राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धेमध्ये भुसावळातील सुनिल नेवे यांना तृतीय पारितोषिक !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – डॉ. भा.ल.भोळे विचार मंच नागपूर आणि राज्यशास्त्र व इतिहास विभाग, यशवंत महाविद्यालय सेलू जिल्हा वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने भारतीय राजकीय व्यवस्था व निवडणूक प्रक्रिया आणि मतदार वर्तन या विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र वर्धा येथे दिनांक 7 डिसेंबर 2024 शनिवार रोजी आयोजित करण्यात आल्या होते.
या चर्चासत्रात आयोजित राज्यस्तरीय शोधनिबंध स्पर्धा मध्ये सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय भालोद तालुका यावल येथील राज्यशास्त्र विषयाचे विभाग प्रमुख डॉ.सुनील नेवे यांना तृतीय क्रमांक चे पारितोषिक प्राप्त झाले. आहे”समकालीन भारतीय लोकशाहीतील निवडणूक आयोगाची भूमिका” या विषयावर डॉ.सुनील नेवे यांनी शोधनिबंध सादर केला.या प्रसंगी मान्यवरांच्या शुभहस्ते डॉ.सुनील नेवे यांचा सन्मानचिन्ह,प्रमाणपत्र, व रोख पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी डॉ. भा.ल.भोळे विचार मंचाचे अध्यक्ष शेषकुमार एरलकर, सचिव डॉ. अशोक काळे ,प्राचार्य डॉ. संदीप काळे ,डॉ. अनंत रिंधे,डॉ. योगेश उगले(परतवाडा, यवतमाळ), डॉ.दिपाली घोगरे(पातूर,अकोला), श्री कथन शहा(मुंबई) डॉ.प्रवीण भागडीकर राज्यशास्त्र अभ्यास मंडळ अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत डॉ. सुनील नेवे यांचा सत्कार करण्यात आला. या शोधनिबंधात डॉ. सुनील नेवे यांनी भारतातील निवडणूक आयोगाच्या भूमिकेविषयी आपले मते व्यक्त केले. डॉ.सुनील नेवे यांनी असे प्रतिपादन केले की, भारतातील निवडणूक आयोग जगातील सर्वात उत्तम असा निवडणूक आयोग आहे.भारतीय लोकशाही चौकटीतील एक कोनशिला म्हणून निवडणूक आयोगाकडे पाहता येईल. जगात भारत हा असा एकमेव देश आहे की, लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोग हा अत्यंत निर्भीडपणे निष्पक्षपणे आपली भूमिका बजावीत आहे.1950 पासून आज पर्यंत ज्या ज्या निवडणुका देशात झाल्या या सगळ्या निवडणुकीचे संचालन निवडणूक आयोगाने केले. हिंसाचार विरहित निवडणुका पार पाडण्याचा प्रयत्न केला. अत्यंत दुर्गम असलेल्या डोंगराळ भागात, पहाडात,नक्षलग्रस्त भागात वास्तव्य असलेल्या प्रत्येक मतदाराला मतपेटीपर्यंत जाऊन मतदान करण्याची संधी निवडणूक आयोगाने प्राप्त करून दिली.त्या साठीच्या सगळ्या व्यवस्था केल्या.देशातील मतदानाचा टक्का अधिकाधिक वाढावा यासाठी वेगवेगळे प्रयत्न निवडणूक आयोगाने केले. स्वीप म्हणजेच सिस्टिमॅटिक वोटर एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन या मोहिमेद्वारे अधिकाधिक मतदारांनी मतदान करावे म्हणून विशेष प्रकारचे प्रयत्न भारतातील निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेले आहे. ही बाब लोकशाही असलेल्या भारताच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे. भारतात निवडणूक आयोगाने आपली भूमिका निर्भीडपणे निष्पक्षपातीपणे पार पाडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला दिसून येतो.