Monday, April 28, 2025
Homeगुन्हारात्रीच्या सुमारास तरुणाकडून गावठी कट्टा जप्त !

रात्रीच्या सुमारास तरुणाकडून गावठी कट्टा जप्त !

रात्रीच्या सुमारास तरुणाकडून गावठी कट्टा जप्त !

चोपडा खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – दुचाकीने चोपड्याकडे येणाऱ्या एका ३१ वर्षीय तरुणाकडून पोलिसांनी गावठी कट्टा हस्तगत केला. १ रोजी रात्री सात वाजेच्या सुमारास तालुक्यातील लासूर ते सत्रासेन रस्त्यावर नाटेश्वर मंदिराच्या टेकडी जवळ ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी त्याच्या ताब्यातून १ लाख ३१ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शिरपूर येथील क्रांतीनगर भागातील मनीष सुभाष जगताप हा सायंकाळी सात वाजेच्या सुमारास मध्य प्रदेशकडून लासूर सत्रासेन रोडने लासुरकडे दुचाकीने येत होता. तेव्हा चोपडा ग्रामीण पोलिसांनी त्याला अडवले असता त्याच्या ताब्यात २५ हजार रुपये किमतीचा एक सिल्वर रंगाचा गावठी कट्टा, दोन हजाराचे दोन जिवंत काडतुस मिळून आले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या