Tuesday, April 29, 2025
Homeजळगावरावेर तालुक्यात शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग

रावेर तालुक्यात शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग

रावेर तालुक्यात शिवसेना शिंदे गटात जोरदार इनकमिंग

खान्देश लाईव्ह न्युज रावेर

लहान वाघोदे तालुका रावेर येथे शिवसेना ( शिंदे गट ) रावेर लोकसभा महिला जिल्हाप्रमुख सौ. नंदाताई प्रकाश निकम यांचे नेतृत्वाखाली असंख्य महिला व पुरुषांचा शिवसेना ( शिंदे गट ) जाहीर प्रवेश करण्यात आला आहे .
दि. 11/01/2025 रोजी दुपारी 4.30. वाजता लहान वाघोदे येथे पार पडलेल्या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना ( शिंदे गट ) पक्षप्रमुख मा. ना. श्री एकनाथरावजी शिंदे साहेब, मुक्ताईनगरचे आमदार मा. श्री चंद्रकांतदादा पाटील व तसेच रावेर लोकसभा जिल्हा प्रमुख श्री समाधानभाऊ महाजन यांचे प्रेरणेने व यांचे नेतृत्वावर विश्वास ठेऊन रावेर लोकसभा शिवसेना महिला जिल्हाप्रमुख सौ. नंदाताई प्रकाश निकम यांचे नेतृत्वाखाली येथील स्थानिक असंख्य महिला व पुरुषांनी शिवसेनेत ( शिंदे गट ) जाहोर प्रवेश केला आहे.

 

Oplus_131072

सदर कार्यक्रमा च्या वेळी उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांपैकी रावेर व यावल तालुका समन्वयक श्री भगवान पाटील, रावेर तालुका संघटक प्रा.श्री राहुल पाटील सर व शिवसेना रावेर लोकसभा जिल्हा महिलाप्रमुख सौ. नंदाताई प्रकाश निकम यांची भाषणे झाली होती याप्रसंगी त्यांनी जाहीर प्रवेश केलेल्या सर्व स्त्री व पुरुषांना शासकीय योजना व इतर महत्वपूर्ण विषयांवर मोलाचे मार्गदर्शन केले आहे .
सदर पक्षप्रवेश कार्यक्रमावेळी प्रमुख अतिथी म्हणून रावेर महिला शिवसेना आघाडीप्रमुख स्वातीताई भंगाळे, यावल शिवसेना महिला आघाडीप्रमुख पूजाताई पाटील, रावेर शिवसेना महिला उपप्रमुख भारतीताई भारुळे, सावखेडा ता : रावेर शिवसेना अध्यक्षा रुपालीताई महाजन, चिनावल शहराद्धक्षा सविताताई भंगाळे, सावखेडा उपशहरप्रमुख कविता मनोज नहाले, फैजपूर महिला शहरप्रमुख रेखाताई मेढे, वाघोदा ग्रा.पं. सदस्य पूजा तुषार कोलते, वाघोदा उपशहरप्रमुख वैशाली प्रमोद चौधरी, रावेर तालुका शिवसेना प्रमुख वाय. व्ही. पाटील, फैजपूर शहर प्रमुख श्री पिंटूभाऊ मंडवले व तसेच भुसावळ येथील समाजसेवक श्री प्रकाशभाऊ निकम हे उपस्थित होते.
या प्रवेशामुळे रावेर तालुक्यात शिवसेना शिंदे गटाचे वर्चस्व वाढले आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या