रावेर – यावल परिसरात जनता घराणे शाहीवर नाराज!
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी : रावेर – यावल मतदारसंघात जनता घराणेशाहीला कंटाळली असून नाराजी दिसून येत आहे.यावेळी निवडणूक जनतेने हातात घेतली होती.
मतदारसंघात नवीन उद्योग तर आलेच नाही, मात्र जे होते ते देखील सत्ता भोगलेल्यांनी बंद पाडले. मधुकर साखर कारखाना बंद पाडण्यात जबाबदार कोण हा सवाल उपस्थित केला आहे
रस्ते नाही, रोजगार नाही, उत्तम आरोग्य व शिक्षण व्यवस्था नसल्याने जनता त्रस्त झाली होती.
जनतेला परिवर्तन हवे होते.गेल्या अनेक वर्षांपासून योग्य उमेदवार मिळत नसल्याने घराणे शाही सुरू होती .रावेर – यावल मतदारसंघातील जनता माझ्या पाठीशी असल्याने माझा विजय निश्चित असल्याचे प्रहारचे उमेदवार अनिल छबीलदास चौधरी यांनी सांगितले आहे