रावेर येथील शासकीय विश्राम गृहा समोर संत श्री लक्ष्मण बापूजी चौकाचे आ .अमोलभाऊ जावळेच्या हस्ते उदघाटन
पाल ता.रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – येथील सावदा रोड वरील शासकीय विश्राम गृहसमोरील रस्त्याच्या चौफुली रस्त्यावरील चौकाचे परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी नावाने उदघाटन 23 जानेवारी रोजी रावेर यावल मतदार आमदार श्री अमोल भाऊ जावळे यांच्या हस्ते करण्यात आले आहे .
यावेळी या वार्ताफलकाचे अनावरण कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुदेव सेवा आश्रम जामनेर चे श्री श्याम चैतन्य जी महाराज होते .
तर प्रमुख अतिथी म्हणून भा ज पा चे जळगाव जिल्हा उपाध्यक्ष श्री पद्माकर भाऊ महाजन,भा ज पा प्रदेश सदस्य श्री सुरेश भाऊ धनके, भा ज पा रावेर तालुका अध्यक्ष महेश चौधरी, भाजपा शहर प्रमुख दिलीप पाटील, महेश पाटील, सुनील महाजन, अरुण शिंदे, नितीन पाटील, सी एच पाटील सर, प्रल्हाद पाटील, संतोष अग्रवाल, लखीम पटेल, भास्कर महाजन, कांतीलाल महाराज, दीपक नगरे, वासू नरवाडे, प्रवीण पाटील, रवी महाजन, प्रकाश पाटील, तोलन कुमार भाट सह चैतन्य साधक परिवार रावेर तालुका समिती आदी मान्यवर उपस्थित होते .
सातपुड्या च्या आदिवासी परिसरात अध्यात्मिक गंगे चे भगीरथ श्री वृंदावन धाम पाल आश्रमाचे व अखिल भारतीय चैतन्य साधक परिवाराचे संस्थापक परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी यांच्या नावाने दि 23 जानेवारी रोजी रावेर येथील रेस्ट हाऊस समोरील सावदा रोड वरील चौफुली ला पूज्य बापूजी यांचे नामकरण देऊन रावेर चे आमदार अमोल भाऊ जावळे यांच्या हस्ते वार्ताफलकाचे उदघाटन करण्यात आले आहे
या वेळी आमदार अमोलभाऊ जावळे यांनी मनोगत व्यक्त करतांना सांगितले कि परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी आपल्या रावेर तालुक्याचे वैभव शाली महापुरुष असून आपल्याला अभिमान आहे. ज्यांनी सातपुड्यातील अज्ञान व अंधश्रद्धेच्या अंधःकारात भरकटलेल्या आदिवासी सह देशभरातील लाखो भक्तांचे आध्यत्मिक जीवन उंचाहून भक्ती च्या मार्गात आणून दिले अश्या महापुरुषाचे गुणगान होणे गरजेचे असून असे कार्य करीत राहायला पाहिजे
तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री श्याम चैतन्य जी महाराज यांनी पूज्य बापूजी चे जीवन चरित्र व आपल्या परिसरात त्यांचे किती महत्व असून आज त्यांच्या या चौकाच्या लोकार्पण कार्यक्रमात उपस्थित भाविकांच्या शेकडो च्या संख्येने व त्यांच्या चेहऱ्या वरील हर्षउल्हासातून दिसून येत आहे.
त्यानंतर आलेल्या मान्यवरांचे सत्कार करण्यात आले होते .
या परम पूज्य संत श्री लक्ष्मण चैतन्य बापूजी चौकाचे ठराव चैतन्य साधक परिवाराकडून रावेर नगर पालिकेला देण्यात आला आहे.