Sunday, March 16, 2025
Homeजळगावरावेर विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती कार्यक्रमात मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद ; डॉ. नरेंद्र...

रावेर विधानसभा मतदारसंघात मतदान जनजागृती कार्यक्रमात मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद ; डॉ. नरेंद्र महाले.

रावेर विधानसभा मतदारसंघात मतदान
जनजागृती कार्यक्रमात मतदारांकडून सकारात्मक प्रतिसाद ; डॉ. नरेंद्र महाले.

यावल दि.१२  खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या संकल्पनेतून तसेच जिल्हा स्वीप नोडल अधिकारी अकलाडे साहेब,जिल्हा सहाय्यक स्वीप नोडल अधिकारी,शिक्षणाधिकारी प्राथमिक विकास पाटील व माध्यमिक कल्पना चव्हाण यांच्या मार्गदर्शक सूचनेनुसार संपूर्ण जिल्हाभरामध्ये मतदान जनजागृती पर कार्यक्रम सुरू आहे.त्यात प्रामुख्याने रावेर विधानसभा मतदारसंघात प्रत्येक मतदारास जागृत करताना,माहिती देताना त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याची माहिती यावल तालुका मतदान जनजागृती सेलिब्रिटी डॉ.नरेंद्र महाले यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुका २० नोव्हेंबर २०२४ ला असल्याने यावल रावेर तालुक्यामध्ये प्रबोधनाचे कार्य शिक्षण विभागाच्या वतीने रोज नियोजनबद्ध रीतीने होत आहे. यामध्ये प्रत्येक मतदारांमध्ये मतदानाची जागृती करत असताना ठीक ठिकाणी मतदानाच्या संदर्भात प्रबोधन केले जात आहे.यामध्ये मतदान करणारा प्रत्येक मतदाराला त्याच्या कर्तव्या विषयी जाणीव करून दिली जात आहे.मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विशेष गाण्यांच्या माध्यमातून,
नाटिकांच्या माध्यमातून प्रबोधनाचे कार्य सुरू आहे. यासाठी आज विशेष म्हणजे यावल बसस्थानक परिसरामध्ये प्रवासी स्त्री पुरुष मतदारांमध्ये सुद्धा प्रबोधनाचे कार्य खूप चांगल्या पद्धतीने झाले.याप्रसंगी यावलच्या तहसीलदार मोहनमाला नाझीरकर,यावल पंचायत समितीच्या बीडिओ डॉ. मंजुश्री गायकवाड, गटशिक्षणाधिकारी विश्वनाथजी धनके यांचे सहकार्य लाभत आहे.
यामध्ये यावल तालुक्याचे मतदान प्रबोधन सेलिब्रिटी म्हणून शिक्षण विभागाच्या वतीने डॉ.नरेंद्र महाले हे प्रबोधनाचे कार्य हे आपल्या उत्कृष्ट भाषा शैलीत करत आहेत.त्यांच्यासोबत यावल येथील सरस्वती विद्या मंदिर मंदिरातील मुख्याध्यापक जी. डी.कुलकर्णी सर हे सुद्धा प्रबोधनाचे कार्य करीत आहे. यावल आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी सुद्धा आज प्रबोधनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.रावेर विधानसभा,मतदार संघामध्ये भरगोस मतदान होण्यासाठी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथजी धनके यांचे सुद्धा योगदान लाभत आहे. लोकशाही राज्यात महत्त्वाचे दान म्हणजे मतदान हे करण्यासाठी प्रबोधनाचे समाजसेवेचे काम रावेर मतदारसंघात अत्यंत कौतुकास्पद पद्धतीने सुरू आहे.सरस्वती विद्यामंदिर
यावलच्या या पुढाकाराने सामाजिक कार्याची जाणीव मतदारांना होत आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या