Wednesday, March 26, 2025
Homeमहाराष्ट्रराष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा  स्पर्धेचा निकाल घोषित.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा  स्पर्धेचा निकाल घोषित.

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा  स्पर्धेचा निकाल घोषित.

मुंबई वृत्तसंस्था – महाराष्ट्रातील सर्व महाविद्यालये व शाळांतील विद्यार्थ्यांसाठी आणि नागरिकांसाठी  राष्ट्रीय मतदार दिवसाच्या निमित्ताने सेकंडरी एज्युकेशन सोसायटी संचलित कला व विज्ञान महाविद्यालय, भालोद येथील राज्यशास्त्र विभागातर्फे ऑनलाईन राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धा  आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेमध्ये एकूण ११३७ स्पर्धकांनी सहभाग घेतला. महाराष्ट्रातील जळगाव, रत्नागिरी,लातूर,धुळे,नाशिक,बुलढाणा,बीड,संभाजीनगर,अहिल्या नगर ,सिंधुदुर्ग,ठाणे,मुंबई,धाराशिव,नांदेड,सांगली,सातारा,सोलापूर,पुणे,नंदुरबार,चंद्रपूर,नागपूर,यवतमाळ,परभणी,वाशीम,पालघर,या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

 

Oplus_131072

स्पर्धे मध्ये एकूण १० प्रश्न बहुपर्यायी स्वरूपाचे विचारण्यात आलेले होते. निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करतो ? निवडणूक आयोगात सध्या किती सदस्य आहेत ?  राष्ट्रीय मतदार दिवस भारतात कधी साजरा केला जातो ?  भारताचे सध्याचे निवडणूक आयुक्त कोण ? निवडणूक आयोगाविषयीच्या तरतुदी घटनेच्या कोणत्या कलमात केलेल्या आहेत ? भारतात कोणत्या वर्षापासून राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करायला सुरुवात झाली ? निवडणूक आयुक्त किती वया पर्यन्त पदावर राहू शकतात ? भारताचे प्रथम निवडणूक आयुक्त कोण ? भारतात मतदान करण्यासाठी वयाची अट किती ? निवडणूक साक्षरतेसाठी खालील कोणत्या उपाययोजना केल्या जातात ? अश्या प्रकारचे प्रश्न विचारण्यात आलेले होते.  एकूण ११३७ स्पर्धकांपैकी ३६४ स्पर्धकांनी २० पैकी २० गुण मिळवले आहेत. स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी रोख पारितोषिके आणि प्रमाणपत्रे  तसेच उत्तेजनार्थ क्रमांकांसाठी 25 पारितोषिके आणि १२ विशेष पारितोषिके एका विशेष समारंभात विजेत्यांना दिली जाणार आहे. सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी मा.प्राचार्य डॉ.किशोर कोल्हे व उपप्राचार्य प्रा.मुकेश चौधरी,संयोजक प्रा.डॉ.सुनील नेवे  यांच्या प्रमुख उपस्थितीत निकाल जाहीर करण्यात आला.
निकाल पुढील प्रमाणे आहे

प्रथम क्रमांक – जवरे तृप्ती भागवत (भुसावळ-जळगाव)
द्वितीय क्रमांक – सुरेंद्र सिंग भगतसिंग मगर (कोठोडे-नाशिक)
तृतीय क्रमांक – धांडे पल्लवी राहुल (भुसावळ-जळगाव)
उत्तेजनार्थ – (एकूण २५ )
1) स्वाती संदीप प्रभावळकर (पुणे)
2) भूमिका चिंतामण गाढे (रेम्भोटा-जळगाव)
3) उर्मिला जनार्दन पाचपांडे (वराडसीम-जळगाव)
4) भाग्यश्री गंगाराम पाटील (ढोली-जळगाव)
5) वैष्णवी गणेश सोनवणे(जळगाव)
6) अजय संजय शिंदे (वडगाव-बुलढाणा)
7)सूरज दिलीप पाडवी(खातगाव-नंदुरबार)
8) प्राजक्ता पोमेंडकर (नऱ्हे-पुणे)
9) आकाश श्रीकृष्ण पवार (जळगाव)
10) भाग्यश्री रवींद्र वासनकर(विवरे बु:-जळगाव)
11) खोंडे दिव्या रवींद्र (खर्डे बु:-धुळे)
12) तायडे शुभांगी संजय (रिंगणगाव-जळगाव)
13) वसावे जोलंती हाना (चीवालीतारा-नंदुरबार)
14) सिद्धार्थ नाना नेतकर (दगडी सबगव्हान-जळगाव)
15) निलेश राजाराम मिस्त्री(न्हावी- जळगाव)
16) नम्रता भगवान सपकाळे (म्हैसवाडी- जळगाव)
17) कनिष्क साळवे (भुसावळ-जळगाव)
18) कौशिकी मकरंद कुलकर्णी (नाशिक)
19) बारी माधुरी शशिकांत (जळगाव)
20) जंगले भाग्यश्री ज्ञानदेव (डोंगर कठोरा-जळगाव)
21) देवेंद्र शैलेंद्र कोळी(भालोद-जळगाव)
22) श्वेता ज्ञानेश्वर बडगुजर (जळगाव)
23) पाटील चेतना पितांबर (खडके-जळगाव)
24) प्रतीक्षा बाबासाहेब तिडके(पडोली-बीड)
25)शेख अर्बिना रफिक (जळगाव)

विशेष पारितोषिक एकूण (१२ )
1)आंब्रे सुहानी संतोष (गुंडे माथावाडी-रत्नागिरी )
2)भांगे ऐश्वर्या दिलीप (वाधावाना खु:-लातूर )
3)डगाळे ज्योती रोहिदास (चिंचावाने-अहमदनगर )
4)दीक्षा सावंत (सिंधुदुर्ग)
5) गव्हाणे उत्कर्षा विजयकुमार (संभाजीनगर)
6) करिष्मा बापू ब्राह्मणे( ठाणे)
7) पवनराजे नागनाथ कावळे (दुधी-धाराशिव)
8) प्रदीप भुमाना तनुरे (नांदेड )
9)प्रज्ञा सुरेश जाधव (सांगली)
10) श्रुती संतोष सापटे (सातारा)
11) सुमित सोमनाथ शिंदे (आलसुंडे-सोलापूर)
12) वैष्णवी जनार्दन नार्वेकर (मुंबई) याप्रमाणे आहे अशी माहिती सुनिल नेवे यांनी दिली आहे

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या