राष्ट्रीय सेवा योजना प्लास्टिक मुक्त परिसरासाठी सज्ज*
फैजपूर प्रतिनिधी खानदेश लाईव्ह
फैजपूर : प्रतिनिधी येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना एकक महाविद्यालय व परिसराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सज्ज झाले आहे. दिनांक 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान *स्वच्छता ही सेवा* या उपक्रमांतर्गत *स्वभाव स्वच्छता व संस्कार स्वच्छता* या अंतर्गत महाविद्यालय परिसर व आजूबाजूच्या परिसराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी सज्ज झाले आहे. याची सुरुवात राष्ट्रीय सेवा योजना स्थापना दिवसाच्या औचीत्याने महाविद्यालयाच्या परिसरात मानव साखळी तयार करून स्वच्छतेची शपथ घेण्यात आली. याप्रसंगी महाविद्यालयात असलेल्या प्रेरणा स्तंभाच्या स्वच्छतेपासून गुरुनानक टेक्स्टाईल व महालक्ष्मी सुपर शॉपी च्या परिसरातील प्लास्टिक एकत्र करून त्याची विल्हेवाट लावण्यात आली. याप्रसंगी उपस्थित स्वयंसेवकांनी स्वतःच्या परिवारापासून गावोगावी स्वच्छतेचा संदेश पोहचविण्याची शपथ घेतली व 100 तास स्वच्छतेसाठी उपक्रमात स्वच्छने सहभागी होऊन येत्या दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांना स्वच्छतेची आदरांजली वाहण्याचे आश्वासन दिले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राजेंद्र वाघुळदे यांच्या मार्गदर्शनाखाली याप्रसंगी प्रा डॉ सचिन नांद्रे, संचालक, राष्ट्रीय सेवा योजना कवियीत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव, दर्शन नेवे, प्रा डॉक्टर सतीश पाटील कार्यक्रम अधिकारी, प्रा डॉ विकास वाघुळदे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, प्राध्यापिका डॉ पल्लवी भंगाळे महिला सहाय्यक कार्यक्रम अधिकारी यांच्या सहित उपप्राचार्य प्रा डॉ कल्पना पाटील, प्रा डॉ आय पी ठाकूर, प्रा कॅप्टन डॉ राजेंद्र राजपूत यांच्या सहित स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.