रासेयो मधून तरूणांना श्रमप्रतिष्ठा सिध्द – प्रा.अर्जुन पाटील
यावल दि.९. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सह समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय यावल येथील विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिर सध्या दत्तक गाव डोंगर सांगवी येथे प्र.प्राचार्या डॉ.संध्या सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.
आज पाचव्या दिवशी सकाळच्या सत्रात राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी मराठी शाळेच्या परिसरातील स्वच्छता करून गावात ‘झाडे लावा झाडे जगवा’ अशा घोषणा देत गावात वृक्ष लागवड संदर्भात प्रभात फेरी काढून जनजागृती केली.
दुपारच्या बौद्धिक सत्रात महाविद्यालयाचे माजी सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा.अर्जुन पाटील यांनी राष्ट्रीय सेवा योजनेतून श्रम प्रतिष्ठेची जाणीव याबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की विद्यापीठाने राष्ट्रीय सेवा योजना ही महाविद्यालयीन स्तरावर सुरू करण्यामागील उद्देश असा आहे.की विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच समाजसेवेचे नेतृत्व करण्याची संधी मिळावी त्यामध्ये ग्रामस्वच्छता अभियान, गावातील साफसफाई, मंदिरातील स्वच्छता अशी वेगवेगळी कामे करून विद्यार्थ्यांमध्ये श्रम प्रतिष्ठेची जाणीव निर्माण होऊन आपली तारुण्यातली शक्तिमय ऊर्जा समाजासाठी उपयोगी पडली पाहिजे त्यामधून खेड्याबरोबर राष्ट्राचा विकास होतो. असे सांगितले.
कार्यक्रमाचे दुसरे वक्ते डॉ.आर.डी. पवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की ऊर्जा बचत करणे ही आज काळाची गरज बनली आहे.आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगात सर्वच उपकरणे ही उर्जेवर चालत असून त्याचा योग्य वापर केला पाहिजे सौर ऊर्जेवर चालणारी उपकरणे सोलर काच,जलपरी,वॉटर हिटर,मशीन,
बल्ब ही उपकरणे सौर ऊर्जेवर चालणारी आहेत पारंपरिक ऊर्जा स्रोत व अपारंपारिक उर्जा स्त्रोत याबद्दल सखोल माहिती दिली आजची उर्जेची बचत उद्याचा सुवर्णकाळ ठरू शकतो असे सांगितले.
कार्यक्रमाचे तिसरे वक्ते मयूर महाजन ( राजोरा समाजसेवक ) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की राष्ट्रीय सेवा योजनेतून समाज प्रबोधन करणे आणि समाजाला आपल्या जबाबदारीची आणि कर्तव्याची जाणीव करून देणे ही महत्त्वाची बाब आहे.आज तरुण पिढी व्यसनाधीनताकडे वळलेली आहे. त्यांना व्यसनाधीनतेचे दुष्परिणाम पटवून सांगणे.तर काही सुशिक्षित बेरोजगार तरूण रोजगाराची संधी शोधत आहेत.त्यांना रोजगाराच्या संधी बद्दल माहिती देणे.तसेच सेंद्रिय शेती संदर्भात पथ नाट्यातून समाजप्रबोधन केले तर समाजाला नवी दिशा मिळेल असे सांगितले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. तेजेस्विनी धनगर, सुत्रसंचालन कु. गायत्री घुले हीने केले तर आभार कु.गायत्री साळवे हीने मानले.
यावेळी कार्यक्रमाला महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.एम.डी.खैरनार,डॉ.प्रल्हाद पावरा (रासेयो कार्यक्रम अधिकारी) डॉ.वैशाली कोष्टी (महिला कार्यक्रमाधिकारी) प्रा.छात्रसिंग वसावे (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी) प्रा.प्रशांत मोरे, श्री.मनोज कंडारे यावेळी कार्यक्रमाला सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते विद्यार्थी मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उपस्थित होते.