रासेयो स्वयंसेवकांनी केला महाविद्यालयाचा परिसर चकाचक !
रावेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – सातपुडा विकास मंडळ पाल संचालित कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय पाल येथील राष्ट्रीय सेवा योजना एककाने “स्वच्छता ही सेवा “या उपक्रमांतर्गत महाविद्यालयीन परिसर स्वच्छ केला आहे. याप्रसंगी महाविद्यालय परिसरात वाढलेले गवत काढण्यात आले तसेच प्लास्टिकचा कचरा जमा करण्यात आला,त्याची योग्य विल्हेवाट सुध्या लावण्यात

आली आहे.स्वच्छता अभियानानंतर स्वयंसेवकांनी अल्पोहराचा पणआस्वाद घेतला.”स्वच्छता ही सेवा” या अभियानांतर्गत करण्यात आलेल्या स्वच्छ्ता मोहीमेला राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.हितेश फिरके ,महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. नफिसा तडवी आणि स्वंयसेवक आदी उपस्थित होते.