रिल्स स्टार खूनप्रकरणी तिघांना अटक !
एरंडोल खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – मुलाकडून होणाऱ्या छळ व मारहाणीला त्रासून माजी सैनिक विठ्ठल पाटील यांनी त्यांच्या रिडल्स स्टार मुलगा हितेश याच्या हत्येप्रकरणी हितेशच्या पत्नीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी एरंडोल पोलिसांनी तिघांना अटक केली असून त्यांना ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मुलाकडून होणाऱ्या छळ व मारहाणीला त्रासून माजी सैनिक विठ्ठल पाटील यांनी त्यांच्या रिडल्स स्टार मुलगा हितेश याच्या हत्येप्रकरणी नामदेव सखाराम पाटील (वय ५५), रवींद्र सुरेश पाटील (वय २४) व भालचंद्र नामदेव पाटील (वय २८) या तीन जणांना एरंडोल पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता सर्व संशयित आरोपींना ३ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी हितेश पाटील याची पत्नी शीतल हितेश पाटील यांनी एरंडोल पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, माजी सैनिक विठ्ठल पाटील यांच्या सुसाईड नोटनुसार पोलिसांनी धरणगाव तालुक्यातील भवरखेडा येथून थोड्या अंतरावर असलेल्या गोविंद बाबा धरणाच्या कोरड्या पात्रात पुरलेला हितेशचा मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर हा मृतदेह जळगाव येथील सामान्य रूग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. हितेशचा मृतदेह काढला, त्यावेळी अमळनेर विभागाचे डिवायएसपी विनायक कोते व तहसीलदार महेश सूर्यवंशी उपस्थित होते.