महामाता रमाई जयंती मोठ्या उत्साहात साजरी!
निंभोरा प्रतिनिधी (प्रविण शेलोडे) – येथे ०७ फेब्रुवारी रमाई जयंती निम्मित भीम व रमाई गीतांचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला आहे
या प्रसंगी जयंती निम्मित भुसावळ येथील संजय सुरवाडे प्रेझेंन्टस सुर ताज तरंग ऑर्केस्ट्रा मुख्य आकर्षण होते.मुख्य अतिथी म्हणून निंभोरा पोलिस स्टेशन चे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरदास जी बोचरे साहेब, हिरालाल कोळी, छोटू पाटील,ज्येष्ठ पत्रकार राजीव बोरसे,पत्रकार प्रवीण धूंदले सर,मनोहर महाजन,सुरेश पाटील,सुनील महाजन,सुरेश महाजन,गोरख पाटील,कांतीलाल गाढे,प्रल्हाद गाढे,राहुल गाढे,पंकज वाघ, इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रशांत गाढे यांनी बुद्ध वंदना घेतली व प्रास्ताविक भीम जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष आकाश कोचुरे यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्र संचलन दिवाकर गाढे यांनी केले तर आभार रमेश वाघ यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी योगेश गाढे, दिपक इंगळे, प्रेम गाढे,संदेश गाढे,योगेश सुरवाडे,सचिन सावळे,सागर गाढे,रोहिदास गाढे ,संजय गाढे, अजय गाढे,छोटू गाढे,ईश्वर सवर्णे,अतुल गायकवाड, रोशन गाढे ,विजय म्हसाणे, रितेश तायडे,शशिकांत गाढे,जीवन गाढे इत्यादींनी मेहनत घेतली.