Wednesday, March 26, 2025
Homeजळगावरेकॉर्डवरील गुन्हेगाराला एलसीबीच्या पथकाने केली अटक! 

रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एलसीबीच्या पथकाने केली अटक! 

रेकॉर्डवरील गुन्हेगाराला एलसीबीच्या पथकाने केली अटक! 

खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – छत्रपती संभाजीनगर येथून महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी चोरून पसार झालेला रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडितराव साबळे (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. या सोनसाखळी चोरीसह अन्य चोऱ्यांचीही त्याने कबुली दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, सदर चोरी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत साबळे याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी सहायक फौजदार संजय हिवरकर, रवींद्र नरवाडे, अतुल वंजारी, पोहेकॉ विजय पाटील, राजू मेढे, हरिलाल पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या पथकाने प्रशांतला सुप्रीम कॉलनी येथून ताब्यात घेतले. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. या तपासादरम्यान सोनसाखळी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले. प्रशांत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या