Monday, March 24, 2025
Homeजळगावरेल्वेतील कर्तव्यदक्ष आणि समाजसेवक गोपाळ बाविस्कर सेवानिवृत्त.

रेल्वेतील कर्तव्यदक्ष आणि समाजसेवक गोपाळ बाविस्कर सेवानिवृत्त.

रेल्वेतील कर्तव्यदक्ष आणि समाजसेवक गोपाळ बाविस्कर सेवानिवृत्त.

भुसावळ दि.२. खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी रेल्वेतील कर्तव्यदक्ष कर्मचारी आणि परीट धोबी समाज प्रिय माजी सचिव गोपाळ बाविस्कर हे रेल्वे पीओएच मधून ३९ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहे. रेल्वेत कर्तव्यदक्षतेने काम करीत असताना त्यांनी समाजात सर्वतोपरी समाज हित साध्य करून विविध समाजोपयोगी कामे केली, त्यांनी ३९ वर्ष अतिशय छान प्रकारे रेल्वे विभागांमध्ये नोकरी केली तसेच हा नोकरीचा प्रवास करत असताना अनेक माणसे त्यांनी जोडले तसेच समाजाच्या कामाला नेहमी प्राधान्य त्यांनी दिले आहे समाजाचे कोणतेही काम असो ते काम आधी व नंतर बाकीचे सर्व कामे असं त्यांनी समाजाला योगदान दिलेले आहे, या सेवानिवृत्तीच्या प्रसंगी परीट धोबी सेवा संस्था भुसावळ यांच्यावतीने त्यांचा सत्कार करताना संस्थेचे अध्यक्ष रमेश ठाकरे,कैलास शेलोडे,  किरण बाविस्कर  बेसन बाविस्कर  संतोष शेलोडे,लक्ष्मण शेलोळे,नरेंद्र वाघ, वामन सपकाळे,प्रवीण सोनवणे, सुधाकर

 

सपकाळे,रवींद्र.  वागळे साहेब निलेश सोनवणे व आवारे परिवार असे सर्व समाज बांधव यांच्या उपस्थितीत त्यांचा सत्कार करताना सर्व समाज बांधव.

गोपाळ बाविस्कर यांना सेवानिवृत्तीनंतरचे आयुष्य अतिशय छान आणि आरोग्यदायी जावो ही सर्व समाज बांधवांतर्फे तसेच सर्व स्तरात त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या