Wednesday, March 26, 2025
Homeगुन्हारेल्वेत चोरी करणाऱ्या महिलांची टोळीला अटक ; चोरीचा मुद्देमाल हस्तगत !

रेल्वेत चोरी करणाऱ्या महिलांची टोळीला अटक ; चोरीचा मुद्देमाल हस्तगत !

रेल्वेत चोरी करणाऱ्या महिलांची टोळीला अटक ; चोरीचा मुद्देमाल हस्तगत !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – हैदराबाद येथून बऱ्हाणपूर येथे हैदराबाद-हिसार एक्सप्रेसने प्रवास करणारे कन्हैयालाल रतीलाल सुगंधी (वय ५०, रा. हैदराबाद) यांच्याकडील मुद्देमाल चोरुन नेला. चोरी केल्यानंतर ही टोळी दुसऱ्या रेल्वेने प्रवास करीत असतांना जळगावात लोहमार्ग व आरपीएफच्या पथकाने त्या टोळीला रविवार दि. २ रोजी अटक केली. त्यांच्याकडून चोरलेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे कि, हैदराबाद येथील कन्हैयालाल सुगंधी हे कुटुंबासह हैदराबाद-हिसार एक्सप्रेसने बऱ्हाणपूर येथे जात होते. प्रवासात ते झोपलेले असताना नगरसोल ते मनमाड स्थानकादरम्यान त्यांची सुटकेस चोरीला गेली. त्यामध्ये रोख सात हजार रुपयांसह सोन्याचे दागिने व कपडे असा एकूण २३ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल होता. या विषयी त्यांनी जळगाव लोहमार्ग पोलिसांकडे फिर्याद दिली. या घटनेचा तपास करीत असताना रेल्वे सुरक्षा बलाचे प्रफुल्ल खर्चे, गजानन पाटील, महेंद्र कुशवाह, शबाना तडवी, मनीष सिंग तसेच जळगाव लोहमार्गचे पोहेकों सचिन भावसार, रवी पाटील, सतीश पाटील, राहुल गवळी यांना दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये चार महिला संशयितरित्या आढळून आल्या.
हैदराबाद-हिसार एक्सप्रेसमध्ये चोरी केल्यानंतर या महिला मनमाड रेल्वे स्थानकावर उतरल्या. तेथून त्या दादर-अमृतसर एक्सप्रेसमध्ये बसून प्रवास करीत होत्या. त्याचवेळी चोरीचा संदेश मिळाल्याने याच रेल्वेत रेल्वे सुरक्षा बलाच्या वरील पथकाने त्यांना हेरले. या महिला सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्या असून रेल्वे बदलली तरी त्यांना पकडण्यात यश आले आहे.

पोलिसांनी या महिलांची चौकशी करीत निशा अशोक बेर्डे (वय ३९), राहया शिंदे (वय २०), पूनम संदीप बर्डे (वय २२), गोधाबाई सतीश बर्डे (वय २०, सर्व रा. येरमाला वस्ती, पारधी फाटा, उस्मानाबाद) यांना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केल्यानंतर त्या महिलांकडे चोरीला गेलेली सुटकेस आढळली. पथकाने ती ताब्यात घेत चारही महिलांना अटक करून मनमाडच्या पथकाकडे त्यांना सोपविले.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या