Thursday, March 27, 2025
Homeजळगावरेल्वे कर्मचाऱ्याची तब्बल ८ लाखात फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

रेल्वे कर्मचाऱ्याची तब्बल ८ लाखात फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

रेल्वे कर्मचाऱ्याची तब्बल ८ लाखात फसवणूक ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल!

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे आमिष दाखवत सुरुवातीला केलेल्या छोट्या गुंतवणुकीवर चार-चार हजार रुपये दिले; मात्र नंतर रेल्वे कर्मचाऱ्याची तब्बल आठ लाख १२ हजार रुपयांमध्ये ऑनलाइन फसवणूक करण्यात आली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की,हा प्रकार ६ ते १८ ऑक्टोबर दरम्यान घडला. या प्रकरणी जळगाव सायबर पोलिस ठाण्यात अनोळखी तीनजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.भुसावळ तालुक्यातील रहिवासी असलेले व सध्या मुंबईत रेल्वेच्या मेकॅनिकल विभागात कार्यरत असलेले कर्मचारी सुटी घेऊन गावी आले होते. त्यावेळी त्यांच्याशी तीन जणांनी व्हॉटस् अॅपवर संपर्क साधून त्यांना एक लिंक पाठविली व टेलिग्राममध्ये अॅड केले. त्यानंतर त्यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास अधिक नफ्याचे आमिष दाखविण्यात आले. त्यानुसार सुरुवातील त्यांनी दोन वेळा प्रत्येकी १० हजार ५०० रुपये व नंतर २० हजार ५०० रुपये गुंतविले. त्या गुंतवणुकीवर प्रत्येकी चार हजार रुपये नफा त्यांना देण्यात येऊन विश्वास संपादन केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या