Monday, March 24, 2025
Homeजळगावरेल्वे रूळ ओलांडत असताना तरुणीला रेल्वेचा धक्का लागण्याने दुर्देवी मृत्यू !

रेल्वे रूळ ओलांडत असताना तरुणीला रेल्वेचा धक्का लागण्याने दुर्देवी मृत्यू !

रेल्वे रूळ ओलांडत असताना तरुणीला रेल्वेचा धक्का लागण्याने दुर्देवी मृत्यू !

जळगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – तालुक्यातील दापोरा येथील २५ वर्षीय तरुणीचा रेल्वे रूळ ओलांडत असताना रेल्वेचा धक्का लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी दापोरा ते शिरसोलीदरम्यान दहा पुलाजवळ घडली.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसांत नोंद करण्यात आली आहे. सुवर्णा पंडित पाटील (वय २५, रा. दापोरा, ता. जळगाव), असे मयत तरुणीचे नाव आहे. मूळची दापोऱ्यातील रहिवासी सुवर्णा ही सध्या शिरसोली येथील बहिणीकडे राहत होती. गुरुवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास ती शेतात जात होती. त्यावेळी दहा पुलाजवळ रेल्वे रूळ ओलांडताना रेल्वेगाडीचा धक्का लागून तिचा जागीच मृत्यू झाला. तालुका पोलिस स्टेशनचे हवालदार अनिल फेगडे, अनिल मोरे, धनंजय पाटील यांनी मृतदेह शासकीय वैद्यकीय रुग्णालयात दाखल केला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या