लिलावात मोजलेल्या वाहनाचे भूईकाटा शुल्क फक्त शेतकऱ्यांसाठी माफ.
यावल कृउबा समितीचा निर्णय.
यावल दि.२८ खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
शेतकऱ्यांचे हिताचा विचार करून यावल बाजार समिती संचालक मंडळाने आज झालेल्या मासिक सभेत शेतकऱ्यांच्या लिलावात आलेल्या सर्व प्रकारच्या वाहनांना भूईकाटा शुल्क माफ करण्याचा निर्णय घेतला आहे.यापूर्वी शेतकऱ्यांच्या वाहनांना वाहन प्रकारानुसार ३० ते १०० रुपये मोजणीसाठी द्यावे लागत होते,ते आता द्यावे लागणार नाहीत. सदरील निर्णयाची अंमलबजावणी १ एप्रिल २०२५ पासून करण्यात येणार आहे.जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल बाजार समितीत विक्रीस आणावा, शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये या उद्देशाने हा निर्णय घेण्याचे ठरले.तसा ठराव आज रोजी झालेल्या मासिक सभेत सर्वानुमते पारित करण्यात आला.
शेतकऱ्यांचे हित डोळ्यापुढे ठेवून शेतमालाचे मोजमाप करण्यासाठी येणाऱ्या खर्चात बचत व्हावी, शेतकऱ्यांचे पैसे वाचावे म्हणून हा निर्णय घेतला.राकेश फेगडे, सभापती कृ.उ.बा.समिती यावल यांनी आपल्या संचालक मंडळाच्या सहकाऱ्यांने घेतला आहे.