लेवा समाजाच्या स्वाती कुणाल जंगले (बाविस्कर) भुसावळ विधानसभेच्या रिंगणात !
भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – आज दिनांक ३० ऑक्टोबर २०२४ रोजी लेवा समाजाच्या सौ स्वाती कुणाल जंगले (बाविस्कर) यांचा फॉर्म स्विकार झाल्यामुळे येणाऱ्या भुसावळ विधानसभा निवडणुकीमध्ये लेवा समाज काय भूमिका घेणार हे बघणे अत्यंत महत्त्वाचे राहणार आहे.
याआधी प्रिती चव्हाण महाजन या लेवा समाजाच्या एकमेव उमेदवार म्हणून उभ्या राहणार होत्या परंतु आता लेवा समाजाच्या स्वाती कुणाल जंगले यांचा ही अर्ज दाखल झाल्याने भविष्यातील राजकीय निर्णय भुसावळ विधानसभा निवडणुकीमध्ये महत्त्वपूर्ण मानला जात आहे. यामुळे आता भुसावळातील राजकारण लेवा समाजाच्या भोवती फिरत असल्याचे चित्र आहे.