Monday, March 24, 2025
Homeभुसावळलोकसभा निवडणुक झाली आणि भुसावळ तालुक्यात ३० हजार मतदार वाढले!

लोकसभा निवडणुक झाली आणि भुसावळ तालुक्यात ३० हजार मतदार वाढले!

लोकसभा निवडणुक झाली आणि भुसावळ तालुक्यात 30 हजार मतदार वाढले!

भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – लोकसभा निवडणूक गेल्या २ महिन्यापूर्वी झाली आणि त्यानंतर मतदारांनी समय सूचकता बाळगून अर्ज करून मतदार यादीत नाव समाविष्ठ करून घेतल्याने भुसावळ विधानसभा मतदार संघात मतदारांची संख्या ही ३ लाख १४ हजार २३ इतकी आहे. लोकसभेच्या वेळी २ लाख ८५ हजार इतकी मतदार संख्या होती. निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार भुसावळ येथील महसूल यंत्रणा कामाला लागली होती अशी माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पाटील यांनी गुरुवार दि.३ रोजी पत्रकार परिषदेत दिली.

प्रांताधिकारी कार्यालयात गुरुवारी दुपारी १ वाजता प्रांताधिकारी जितेंद्र पाटील,तहसीलदार निता लबडे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले.यावेळी प्रांत पाटील यांनी माहिती दिली की,मतदार यादीत नाव नोदणी सुरू आहे. मतदारांनी त्यांची नावे मतदार यादीत नसल्यास नोंदवून घ्यावीत. ऑनलाईन सुध्दा मतदार नोंदणी सुरू आहे.स्थिर पथक,भरारी पथक यांची नियुक्ती केली आहे. आचारसंहिता प्रमुख म्हणून पालिकेचे मुख्याधिकारी हे शहरी भाग तर गटविकास अधिकारी हे ग्रामीण भागासाठी प्रमुख राहतील. मतदारांना असलेल्या शंकांचे निरसन करण्यासाठी सुध्दा मतदान कक्ष सुरू केला होता आणि आहे. ३६ सेक्टर अधिकारी नियुक्त केले आहे.

भुसावळ विधानसभेसाठी ३ लाख १४ हजार २३ मतदार आहे. यात ४० तृतीय पंथी, १ लाख ५३ हजार ७५ महिला मतदार तर १ लाख ६० हजार ९०८ पुरुष मतदार आहे. दिव्यांग मतदारांची संख्या २ हजार ५९९ इतकी आहे.ज्येष्ठ नागरिक मतदार जे ८५ वयापेक्षा जास्त असलेले मतदार ३ हजार १७३ आहे. १८ ते २६ वयोगटातील मतदारांची संख्या ६ हजार ७४३ इतके आहे.

मागील विधानसभा निवडणुकीत ४८.६६ टक्के मतदान झाले होते, यंदा त्यात वाढ करून ही संख्या ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान व्हावे यासाठी निवडणूक आयोगाकडून जनजागृती करण्यात येत आहे.मतदानाचे साहित्य तहसील कार्यालयातून दिले जाईल आणि जमा केले जाईल. मतमोजणी सुध्दा तहसील कार्यालयाच्या गोदामात होणार आहे. अशी माहिती प्रांत पाटील व तहसीलदार लबडे यांनी संयुक्तिकरित्या दिली.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या