वरणगांव बांधकाम मजुरांना न्याय मिळण्यासाठी जिल्हाधिकारी यांना निवेदन
वरणगांव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगाव येथील बांधकाम मजुरांना विविध शासकिय योजनांचा लाभ मिळण्यासाठी जळगांव उप जिल्हाधिकारी यांना सविता माळी यांनी निवेदन दिले आहे .
निवेदनात म्हटले आहे की वरणगाव येथे शेकडो बांधकाम मजूर असून ते दररोज रोजंदारीवर सेंट्रींग व बांधकामाच्या कामाला जात असतात, परंतु त्यांनी बांधकाम मजुरांना मिळणाऱ्या शासकिय योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन फॉर्म भरून सुद्धा अद्याप त्यांना न्याय मिळाला नाही . नेमका गरीबा वर हा अन्याय होत आहे .
त्यांचे फार्म रिजेक्ट करण्यात आले आहे .वेळोवेळी संपर्क साधून दोन ते तीन वेळा फॉर्म भरल्यावर सुद्धा त्यांना आमच्यापर्यंत लाभ मिळाला नाही . एजंट मार्फत ज्यांनी फार्म भरले त्यांना लाभ मिळाला आहे .
सदरचा हा अन्याय बांधकाम मजूरावर होत असून त्यांना न्याय मिळाल्यास उपोषणाचा मार्ग अवलंबला जाईल असे निवेदनात म्हटले आहे .
निवेदनाची प्रत ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांना पाठविण्यात आली आहे .