वरणगावचा पाणीपुरवठा सुरळीत करा उबाठा शिवसेनेची मागणी
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – येथील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात यावा यासाठी शिवसेना उबाठातर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे .
निवेदनात म्हटले आहे की गेल्या दोन वर्षापासून वरणगाव मध्ये महिन्यातून फक्त दोन वेळा पाणी दिले जात असून रात्री बे रात्री पाणी सोडण्यात येते त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे . लवकरात लवकर पाणी पुरवठा सुरळीत न केल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा सुद्धा देण्यात आला आहे .
निवेदनावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विलास मुळे, सुभाष चौधरी , सुनील भोई , गुणवंत भोई आबा सोनार , संदीप पाटील ,अशोक शर्मा, सुखदेव धनगर , आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत .