वरणगावचे सत्य साई सेवा संघटनेतर्फे मोफत मोतिबिंदू शिबिराच्या आयोजन
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी येथील श्री सत्यसाई सेवा संघटनेतर्फे सहा फेब्रुवारी रोजी मोफत मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे
वरणगांव येथील सत्य साई समिती हॉल स्वामी समर्थ मंदिरा जवळ या ठिकाणी करण्यात आले आहे .
रुग्णांना तपासण्याची वेळ सकाळी आठ ते बारा पर्यंत राहणार आहे
तरी इच्छुकांनी उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन श्री सत्यसाई सेवा समिती तर्फे करण्यात आले आहे
वरणगाव येथील श्री सत्यसाई सेवा संघटना ही आरोग्य विषयी वेगवेगळे शिबिर करून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आहे यापूर्वीसुद्धा यांनी या पद्धतीची शिबिर राबवून अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया मोफत करून आणल्या आहे .