वरणगावात दिव्यांग कार्यालयाचे उद्घाटन
-पोलीस ठाण्यात दिव्यांग बांधवांना योग्य सहकार्य करण्याची एपीआय आर.बी.गांगुर्डे यांची ग्वाही
वरणगाव – शहरातील दिव्यांग बांधवांना पोलीस स्टेशनमध्ये काही अडीअडचणी असल्यास योग्य ते सहकार्य करण्याची ग्वाही वरणगाव पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आर. बी. गांगुर्डे यांनी रविवार दि. ७ ऑक्टोबर रोजी दिव्यांग बांधवांच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी दिली.
वरणगाव दिव्यांग संघटना यांच्या वतीने शहर आणि परिसरातील दिव्यांग बांधवांसाठी कार्यालयाचे उद्घाटन रविवार दुपारी ११ वाजता जुनी भाजी साथ, विठ्ठल मंदिर जवळ, दिव्यांग कार्यालयाचे उद्घाटन वरणगाव पोलीस स्टेशनचे आर. बी. बी गांगुर्डे, स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे रावेर विभागीय अध्यक्ष संतोष माळी, स्टॅम्प वेंडर प्रल्हाद सोनार, दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष सुनील शेटे यांच्या हस्ते करण्यात आले. दिव्यांग कार्यालयाचे उद्घाटन झाल्यानंतर विठ्ठल मंदिरात झालेल्या कार्यक्रमात आपल्या भाषणात एपिआय गांगुर्डे यांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांच्या पोलीस स्टेशन मधील काही अडीअडचणी असल्यास त्या सोडवण्यास मी कटिबद्ध राहील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिव्यांग बांधवांना दिली. प्रमुख अतिथी आणि मार्गदर्शक म्हणून
स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचे विभागीय अध्यक्ष संतोष माळी यांनी सांगितले की, दिव्यांग बांधवांना शासनातर्फे अंत्योदय कार्ड धारकांना ३५ किलो धान्य मिळते. परंतु आता आपल्या भुसावळ तालुक्यात इष्टांक (कोठा) नसल्याने दिव्यांग बांधवांना अंत्योदय कार्ड सुरू करण्यास अडचणी येत आहे. दिव्यांगांसाठी इष्टांक वाढवून देण्याची मागणी केली असल्याचे संतोष माळी यांनी सांगितले, तसेच शासनाच्या विविध योजना दिव्यांग बांधवांना समजण्यासाठी सुनील शेट्टी यांना यापुढे वेळोवेळी सहकार्य करण्याची ग्वाही माळी यांनी दिली.
स्टॅम्प वेंडर प्रल्हाद सोनार यांनी देखील शासन स्तरावर दिव्यांग बांधवांसाठी शासकीय कामकाजात मार्गदर्शन आणि सहकार्य मदत करण्याचे यावेळी सोनार यांनी सांगितले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीव्यांग संघटना उपाध्यक्ष शेख रहमान, विजय चौधरी, रामा शिवरामे, जितेंद्र सैतवाल, शेख वाशिद, बबलू परदेशी, राम शेटे, दिगंबर माळी, सुक्राम माळी, सुनील पाटील, संतोष देशमुख, सविता माळी, भारती सोनवणे, राजू माळी, विवेक जोशी, देविदास चव्हाण, भारती थोरात, तनुजा झांभरे, दुर्गा वणी, वंदना माळी, काशिनाथ माळी, कासीम खान, सय्यद अझहर आली, अय्युब खान यांच्यासह शहरासह परिसरातील दिव्यांग बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय चौधरी यांनी केले तर आभार बबलू परदेशी यांनी मानले..