Sunday, April 27, 2025
Homeगुन्हावरणगावात नायलॉन मांजा जप्त . स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वरणगावात नायलॉन मांजा जप्त . स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वरणगावात नायलॉन मांजा जप्त . स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी
वरणगाव . दिनांक १४ जानेवारी रोजी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांचे आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील पो.उप.नि.शरद बागल पो.हे.कॉ.प्रीतम पाटील पो.ना.श्रीकृष्ण देशमुख पो.कॉ.रविंद्र कापडणे पो.कॉ.रविंद्र चौधरी यांनी
वरणगा पो.स्टे. हद्दीतील भोगावती नदी परिसराजवळ असलेले कृष्णा काईट अँण्ड फुटाणे सेंटर या दुकानातून १६ हजार ५००रु.कि.चा नायलॉन मांजा जप्त केला .
या प्रकरणी शिवाजी देवराम भोई ५५ रा.भोई वाडा वरणगाव हे शासनाने विक्री करण्यास प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा विक्री करण्याच्या उद्देशाने कब्जात बागळतांना मिळून आले आहे त्यांच्या जवळून नायलॉन मांजाच्या १७ प्लाॅस्टिकच्या चक्री व इतर साधन जप्त करण्यात आले असुन त्याबाबत वरणगाव पो.स्टे.ला भा.न्या.सं.Palm चे कलम १२५ सह पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६चे कलम ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या