वरणगावात शिवसेना शिंदे गटात पुरुष व महिलांचा प्रवेश
वरणगाव खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – शिवसेना शिंदे गट जिल्हाप्रमुख समाधान महाजन सर यांच्या वाढदिवसानिमित्त संपन्न झालेल्या कार्यक्रमात शिवसेनेवर विश्वास ठेवून अनेक महिला पुरुषांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे
यावेळी मुक्ताईनगरचे आमदार चंदूभाऊ पाटील तसेच शिवसेना महिला जिल्हाप्रमुख नंदाताई प्रकाश निकम, शिवसैनिक प्रकाश भाऊ निकम यांनी महाजन सर यांना शुभेच्छा दिल्या. आमदार चंदू भाऊ पाटील यांच्या उपस्थित मध्ये महिलांनी व पुरुषांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश मोठ्या संख्येने करण्यात आले आहे
यावेळी महिलांचे प्रवेश जिल्हाप्रमुख नंदाताई निकम यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शिवसैनिक महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या वेळी वर्षा तल्लारे पूजा पाटील स्वाती बंगाळे शिवानी पाटील संगीता ताई आदींनी कार्यक्रमात उपस्थिती दिली
यावेळी आमदार चंदूभाऊ यांनी शिवसैनिकांनी कार्यतत्पर राहावे असे आवाहन केले आहे