वरणगावात स्वातंत्र्य दिनानिमित्त शिवबा मंडळ आणि हिंदवी स्वराज्य ग्रुप तर्फे भारत माता प्रतिमेला अभिवादन
वरणगाव – भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट रोजी सकाळी ७.३० वाजता मोठा माळी वाडा येथील प्रवेशद्वारावर शिवबा मित्र मंडळ यांच्या वतीने भारत माता यांची प्रतिमा ठेऊन सुरवातीला मंडळाचे मार्गदर्शक तथा शिवसेना भुसावळ विधानसभा प्रमुख संतोष माळी यांनी भारत माता प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मंडळाचे जेष्ठ प्रवीण माळी, गणेश माळी, भूषण माळी, विशाल माळी, कमलाकर माळी, पांडू माळी, तेजस माळी, रितेश माळी, पप्पू माळी, हर्षल माळी, शुभम माळी, प्रशांत माळी उमेश माळी, विवेक माळी, संकेत माळी, वीरेंद्र माळी, वैभव माळी, यश माळी, ओम माळी आदी मंडळाचे सदस्य उपस्थित होते.
हिंदवी स्वराज्य ग्रुपतर्फे प्रतिमापूजन
वरणगाव – येथील गांधी चौकातील हिंदवी स्वराज्य ग्रुप यांच्या तर्फे 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त गांधी चौकात भारतमाता यांची प्रतिमा ठेवून पुष्पहार अर्पण करून प्रतिमा पूजनसह अभिवादन करण्यात आले. यावेळी हिंदवी स्वराज्य ग्रुपचे गोलू निंबाळकर, संतोष माळी, मोनु देवगिरीकर, अर्जुन चौधरी, धीरज निंबाळकर, गणेश निंबाळकर, पवन चौधरी, दीपक जैन, राहुल माळी, शुभम चौधरी, प्रवीण माळी, विशाल माळी, तेजस माळी, उमेश माळी यांची उपस्थिती होती.