भुसावळ खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – वरणगाव फॅक्टरी चोरीस गेलेल्या पाच पैकी तीन रायफली जाडगाव शिवारात रेल्वे लाईन जवळ सापडल्या असल्याची माहिती मिळाली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, तीन दिवसापासून केंद्रीय तपासणी पथक वरणगांव फॅक्टरीमध्ये आले असून गुप्त माहितीच्या आधारे जाडगाव गावालगत रेल्वे लाईन जवळ तीन रायफली असल्याची माहिती मिळाली होती.मिळालेल्या रायफली एके ४७ आहेत. याबद्दल गुप्तता पाळली जात आहे. घटनेतील दोन रायफल गायब आहेत. त्यांचा शोध श्वान पथका द्वारे घेण्यात येत असून श्वानाने सदगुरू बैठक रोड पर्यत मार्ग दाखवला आहे. पुढे पाणी असल्यामुळे पुढील माहिती श्वानाला मिळू शकली नाही.परंतु या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.२१ऑक्टोबर पासून वरणगांव फॅक्टरी येथुन पाच रायफल चोरीस गेल्याची तक्रार वरणगाव पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून फॅक्टरी मध्ये पूर्णपणे शोध सुरू होता.पोलीस व केंद्रीय पथक शोध घेत होते. अखेर तीन रायफल शोधण्यात यश आले असले तरी पूर्णपणे गुप्तता पाळली जात आहे.
या घटनेत दोन संशयित यांना ताब्यात घेण्यात आल्याचेही समजते परंतु संबधित यंत्रणा याबाबत माहिती देण्यास नकार देत आहे. नेमका प्रकार काय हे प्रसार माध्यमांना सांगायला अधिकारी तयार नाही .