वरणगाव तिरंगा सर्कल येथे अवैध रिक्षा स्टॉपमुळे वाहतुकीस अडथळा, अपघाताची शक्यता
वरणगाव खानदेश लाईव्ह न्युज प्रतिनिधी वरणगांव शहरातील तिरंगा सर्कल येथे बेकायदेशीर रिक्षा थांब्यामुळे वाहतुकीस मोठा अडथळा निर्माण होत आहे. या अनधिकृत रिक्षा थांब्यामुळे रस्त्यावर गोंधळ वाढत असून, अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
तिरंगा सर्कल हे वरणगाव शहरातील मुख्य चौकांपैकी एक असून, येथे नेहमीच वाहनांची मोठी वर्दळ असते. तिरंगा सर्कल हे देशाच्या अभिमाना चा विषय आहे भर चौकात याचा राउंड मोठा घेतल्याने व आजुबाजुस अतिक्रमण वाढल्याने वाहनांना वळण घेण्या साठी कसरत करावी लागते . या कारणाने अपघात होवु शकतात तसेच याठिकाणी बुधवारी एस टी ने या तिरंगा सर्कल राउंड च्या भितीं ला धडक दिली .
या ठिकाणी रिक्षाचालकांनी नियमांकडे दुर्लक्ष करत अनधिकृतरित्या येथे रिक्षा थांबवण्यास सुरुवात केली आहे. यामुळे प्रवाशांना आणि वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. या रस्त्यावर बस , लक्झरी, डंफर , रुग्णवाहीका आदींची रहदारी मोठ्या प्रमाणात आहे .
स्थानिक नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या समस्येबाबत नाराजी व्यक्त केली आहे. “रिक्षा अवैधपणे उभ्या असल्यामुळे वाहतूक कोंडी होते. शिवाय, अचानक रिक्षा वळवल्या जात असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढली आहे,” असे एका स्थानिक रहिवाशाने सांगितले.
यासंदर्भात प्रशासनाने त्वरीत उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. पोलिस आणि वाहतूक विभागाने याकडे लक्ष देऊन कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.