वरणगाव येथे शांतता समितीची बैठक संपन्न .
वरणगाव :येथिल पोलीस स्टेशनच्या सभागृहामधे नवदुर्गा उत्सव निमित्त सर्व मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते मुक्ताईनगरचे पोलीस विभागीय अधिकारी राजकुमार शिंदे व विविध पक्षांचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत शांतता समितीची सभा दि.३० सप्टेंबर रोजी सायंकाळी पार पडली .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक पोलिस निरीक्षक जनार्दन खंडेराव यांनी केले. सदर शांतता समितीच्या सभेमधे मुक्ताईनगरचे पोलीस उपविभागीय अधिकारी राजकुमार शिंदे यांनी सण उत्सव साजरे करतांना कुणाच्या भावना दुखावणार नाही याची काळजी घ्यावी कुठल्याच प्रकारे अतिरेक न करता शांततेच्या मार्गाने दुर्गात्सव साजरा करावा . जनार्दन खंडेराव यांनी सुद्धा आपण सण उत्सव आनंदाने साजरे करतो त्यामुळे सर्वांना आनंदाचे वाटप करीत सर्व हिंदु मुस्लीम बांधवांनी खेळीमेळीच्या वातावरणात उत्सव साजरा करावा ‘ कुणाच्या भावनांना ठेस पोहचणार नाही याची काळजी घ्यावी . तसेच या वेळी चंद्रकांत हरी बढे सर, विलास मुळे राजेंद्र चौधरी, शे .सईद यांनी सुद्धा आपआपले विचार मांडून उत्सव खेळीमेळीच्या वातावरणात साजरा करावा अशी मते व्यक्त केली , यावेळी संतोष माळी, सय्यद जाफरअली,विलास मुळे,शेख सईद ,साजीद कुरेशी,राजेश चौधरी, यांचेसह आजुबाजुच्या खेडयापाडयातील पोलीस पाटील , व विविध मंडळांचे कार्यकर्ते यांची उपस्थिती होती .विलास मुळे यांनी नगर परिषदेची अधिकारी व विजमंडळाचे अधिकारी उपस्थित नसल्याबद्दल खंत व्यक्त केली ‘ कार्यक्रम यशस्वीते साठी पोहेकॉ प्रशांत ठाकुर , विजय बाविस्कर ,राजु फालक आदीनी परिश्रम घेतले .