वरणगाव रेल्वे स्थानकावर एक्सप्रेस गाड्यांना थांबा द्या या मागणीसाठी नागरिकांचे हल्लाबोल आंदोलन
वरणगाव : ता . भुसावळ ,येथिल रेल्वे स्थानकावर कोरोना काळापूर्वी सेवाग्राम एक्सप्रेस ‘ सुरत अमरावती अपडाऊन एक्सप्रेस संध्याकाळची पॅसेंजर या गाड्यांना थांबा दिला जात दोता .परंतु कोरोना काळापासून सदर गाडयांचा थांबा बंद झाल्यामुळे वरणगावकरांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे . म्हणून बंद झालेल्या गाड्यांचा थांबा पुन्हा सुरू करावा यासह इतर मागण्यांसाठी येथिल रेल्वे स्थानकावर दि .१६ ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आले .
पुर्वीप्रमाणे थांबणाऱ्या गाड्यांसह अमरावती पुणे एक्सप्रेस,अजमेर एक्स्प्रेस , शिर्डी साईनगर एक्स. , महाराष्ट्र डाऊन एक्सप्रेस या नवीन गाड्यांना थांबा द्यावा व मेमो गाडीच्या फेऱ्या वाढवण्यात याव्या सिद्धेश्वर नगर येथे जाण्यासाठी अंडर बायपास फुल तयार करावा ‘ बोदवड कडे जाण्यासाठी नागेश्वर मंदिराजवळ उड्डाणपूल तयार करावा वरणगाव रेल्वे स्टेशनवर आरक्षण खिडकी सुरू करा आचेगाव येथे मेमो गाड्या थांबवण्यात यावा अशा बारा मागण्यासाठी आम्ही वरणगावकरांच्या वतीने प्रवासी संघटना वरणगाव शहर फाउंडेशन वरणगाव दिव्यांग आघाडी यांच्या वतीने रेल रोको चे आयोजन केलं होतं या आंदोलनात नागरिकांनी प्रचंड संख्येने उपस्थिती होती .रेल्वे अधिकारी यांना खडे बोल माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी सुनावले ‘ व रेल्वे प्रशासनावर हल्लाबोल केला त्यामुळे वातावरण अत्यंत तप्त झाले होते डी आर एम प्रतिनिधी प्रवीण साळुंके तसेच आरपीएफ चा मोठा बंदोबस्त होता वरणगाव पोलीस स्टेशन चे एपीआय जनार्दन खंडेराव यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता यावेळी नागरिकांनी आपल्या संतप्त भावना रेल्वे अधिकारी यांच्या जवळ व्यक्त केल्या आंदोलनाचे नेतृत्व माजी नगराध्यक्ष सुनील काळे अशोक श्रीखंडे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष नाना चौधरी शामराव धनगर भाजपा अध्यक्ष सुनील माळी दिव्यांग आघाडी अध्यक्ष सुनील शेटे सविता माळी शेख अखलाक मिलिंद मेढे नगरसेविका मालाताई मेंढे डॉक्टर प्रवीण चांदणे जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद भैसे फजल शेख अजमल खान हितेश चौधरी रमेश पालवे गजानन वंजारी योगेश माळी आकाश निमकर डॉ सादिक फहीम शेख कदिर सेठ सुधाकर बावणे कृष्णा महाजन राहुल जंजाळे शबांनाबी खान कलाबाई माळी महेंद्र सैतवाल शंकर पवार पप्पू कोळी मंगेश चौधरी यांच्यासह असंख्य
नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते
यावेळी रेल्वे ने एक्सप्रेस गाड्या न थांबवल्यास आंदोलन अधिक तिव्र करणार असून जोपर्यंत गाडया थांबणार नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही आणि वरणगाव करांवरील अन्याय सहन करणार नाही . असा भावपूर्ण उद्गार माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी रेल्वे प्रशासना समोर मांडले . यावेळी रेल्वे प्रशासनाने आपले म्हणणे वरिष्ठापर्यंत पोहचवू व त्यांच्या आदेशान्वये कारवाई करू असा शब्द दिला .