Monday, March 17, 2025
Homeजळगाववरणगाव शहराला सीएसआर निधी न दिल्यास राखेचे वाहने थांबवणार

वरणगाव शहराला सीएसआर निधी न दिल्यास राखेचे वाहने थांबवणार

वरणगाव शहराला सीएसआर निधी न दिल्यास राखेचे वाहने थांबवणार .
माजी नगराध्यक्ष सुनील काळे
वरणगाव .. प्रतिनिधी ‘ दिपनगर प्रशासनाकडून दिला जाणारा सीएसआर निधी हा वरणगाव शहर सोडून इतर 29 खेड्यांना वितरित केला मात्र वरणगाव शहराला त्या सीएसआर निधीतून वगळण्यात आल्याने एक प्रकारे वरणगाव शहरावर मोठ्ठा अन्याय झालाय त्या अन्याया विरुद्ध आज वरणगाव चे माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिपनगर वीज निर्मिती केंद्र 660 येथे धडक देऊन मुख्या अभियंता श्री चव्हाण यांना आक्रमक पने धारेवर धरले व मुख्य अभियंता श्री चव्हाण यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सन्मानाने कॉन्फरन्स हॉलमध्ये नेऊन तब्बल दोन तास मीटिंग केली यावेळी दीपनगर वीज निर्मिती केंद्राचे श्री तायडे यांच्यासह संपूर्ण अधिकारी वरणगाव शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे यांनी मुख्य अभियंता श्री शशांक चव्हाण यांना निधी न दिल्या बद्दल जाब विचारला सर्व कार्यकर्त्यांच्या उपस्थित वरणगाव शहरातून एक ही राखे चे वाहन जाऊ न देण्याचा कडक इशारा दिला सीएसआर योजनेत वरणगाव शहराला निधी न दिल्यास वरणगाव शहरातून एकही राखी चे ट्रॅक्टर जाऊ देणार नाही असा आक्रमक पवित्र घेऊन प्रशासनाला धारेवर धरले यावेळी पदाधिकारी व कार्यकर्ते व दीपनगर प्रशासनात शाब्दिक चकमकी झाल्या व प्रशासनाचे तारांबळ उडाली या बैठकी प्रसंगी मुख्य अभियंता श्री शशांक चव्हाण उपमुख्य अभियंता संतोष वकारे उप मुख्य अभियंता श्री तायडे स्थापत्य यांनी वरणगाव शहरातल्या विविध विकास कामांचे प्रस्ताव तातडीने मुख्यालयाला पाठवून या सीएसआर योजनेत वरणगावला सुद्धा निधी देण्यासंदर्भात आम्ही

 

सकारात्मक आहोत व निधी देण्याबाबत कार्यवाही करतो असे आश्वासन यावेळी माजी नगराध्यक्ष सुनील काळे उपनगराध्यक्ष शेख आकला तालुका उपाध्यक्ष शामराव धनगर मिलिंद भाई आकाश निमकर नाना चौधरी ज्ञानेश्वर घाटोळे हाजी फहीम शेख हाजी कबीर शेठ रमेश पालवे चंद्रकांतजी बढे संतोष पाटील अनिल वंजारी एड ए जी जाजाळे राहुल जंजाळे नंदू भैया जोशी शांताराम माळी साबीर कुरेशी डॉक्टर सादिक शेख शेख फजल भाई अजमल खान डॉक्टर इद्रिस गणेश माळी मुन्ना माळी विलास वडर सागर पवार शंकर पवार योगेश माळी रामभाऊ माळी राजेंद्र नागणे पिंकेश घाटोळे गणेश वाघ गजानन लोहार राहून रंधे कौतिक कोळी अजमल कुरेशी यांच्या. सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी प्रचंड घोषणा बाजी झाली वरणगाव शहराला सी एस आर निधी मिळालाच पाहिजे निधी आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा अश्या घोषणांनी परिसर दणाणून गेला

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या