Monday, April 28, 2025
Homeजळगाववस्त्रोद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणार : संजय सावकारे

वस्त्रोद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणार : संजय सावकारे

वस्त्रोद्योगाला आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणार : संजय सावकारे

भुसावळ खान्देश लाईव्ह न्युज प्रतिनिधी – शहर पत्रकार संस्थेतर्फे पत्रकार दिनानिमित्त नवरत्न पुरस्कारांचे वितरणभुसावळ ( वा ) आजच्या बदलत्या काळाच्या गरजा ओळखून वस्त्रोद्योगाला लवकरच आम्ही आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणार आहोत अशी माहिती वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनी दिली. ते शहर पत्रकार संस्थेतर्फे पत्रकार दिनानिमित्त आयोजित नवरत्न पुरस्कार वितरण समारंभात बोलत होते.
याप्रसंगी प्रांतअधिकारी जितेंद्र पाटील, प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे, सरकारी वकील व शहर पत्रकार संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अॅड नितीन खरे, माजी अध्यक्ष श्रीकांत जोशी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. पंचायत समितीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर सभागृहात झालेल्या या समारंभात सावकारे पुढे म्हणाले कि राज्यात रोजगार व उत्पन्न वाढवून देण्याची क्षमता असलेले माझे खाते असून पहिल्यांदाच ते स्वतंत्र खाते करण्यात आले आहे. पूर्वी ते पणन व वस्त्र उद्योग असे एकत्रित खाते होते. समाजात उत्कृष्ट काम करणारे लोकही असल्याने आज जग चालले आहे .त्यामुळे चांगले लोक शोधून त्याचे कार्य समाजासमोर आणणे आवश्यक आहे. प्रसार माध्यमे भरपूर असली तरी आधुनिक काळातही प्रिंट मीडियाची विश्वासार्हता अद्यापही शाबूत आहे असे संजय सावकारे म्हणाले. प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांचेही यावेळी भाषण झाले. त्यांनी आपल्या भाषणातून पत्रकारांच्या कार्याचा गौरव करुन पत्रकारांना बातमी करीता किती मेहनत घ्यावी लागते ते सांगितले.
पत्रकार दिनानिमित्त आनंदा पाटील (पत्रकार), चंद्रकांत महाराज (समाज प्रबोधनकार) सतीश महाजन (रक्तदान सेवक), किशोर अंबोले (एसटी कर्मचारी), विवेक वणीकर (ज्येष्ठ छायाचित्रकार), मंगला पाटील, (महिला उद्योजक), दीपक अग्रवाल (पोस्ट ऑफिस कर्मचारी), अनिल साळवे (रेल्वे कुली रेल्वे स्टेशन), हमीद भुसावली (शायरीकार) यांना नवरत्न पुरस्कार देऊन वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांच्या सन्मानित करण्यात आले. दैनिक आव्हानचे ज्येष्ठ संपादक प्रफुल्ल नेवे यांना विशेष सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष प्रेम परदेशी यांनी प्रास्ताविक केले तर प्रमोद आठवले, डॉ. जगदीश पाटील, सुनील आराक यांनी सूत्रसंचालन केले. सचिव हबीब चव्हाण, प्रोजेक्ट चेअरमन श्याम गोविंदा, उज्वला बागुल यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संतोष शेलोडे, कलीम पायलट, आकाश ढाके , विनोद गोरधे ,कमलेश चौधरी, विनोद सुरवाडे, सुरेश महाले, सतिश कांबळे, निलेश फिरके गोपाल म्यांद्रे, श्रीकांत वानखेडे, जोहेब शेख, अझर शेख मझर शेख यांनी परीश्रम घेतले.
RELATED ARTICLES

ताज्या बातम्या