Monday, March 17, 2025
Homeजळगाववाघूर नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह ३ दिवसांनी सापडला !

वाघूर नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह ३ दिवसांनी सापडला !

वाघूर नदीत पोहायला गेलेल्या तरुणाचा मृतदेह ३ दिवसांनी सापडला !

जामनेर खान्देश लाईव्ह न्यूज प्रतिनिधी – जामनेर तालुक्यातील पाळधी-नाचणखेडा दरम्यान असलेल्या वाघूर नदीत पोहायला गेला असताना बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह तीन दिवसांनी सापडला आहे.

याबाबत सविस्तर वृत्तांत असे की, मृत तरुणाचे नाव सचिन प्रकाश बोरोले (२२, नाचणखेडा) असे आहे. नाचणखेडा पुलाजवळील नदीपात्रामध्ये बांध बांधलेला आहे, त्याठिकाणी हे काही तरुण पोहण्यासाठी गेले होते. त्यातील तीनजण पोहण्यासाठी पाण्यात उतरले; परंतु रात्रीच्या वेळी या भागात जोरदार पाऊस झाल्याने नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढलेला होता. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे हे तिघेजण बुडू लागले. मात्र त्यातील दोनजणांना वाचविण्यात यश आले. सचिन बोरोले हा बेपत्ता होता. त्याचा मृतदेह शनिवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास नदीपात्राच्या बंधाऱ्याजवळ पाण्यावर तरंगताना आढळून आला आहे. दरम्यान माहिती मिळताच घटनास्थळी पो.नि. सचिन सानप, कर्मचारी सत्यवान कोळी व सुभाष पाटील यांनी धाव घेत पंचनामा उरकला.

RELATED ARTICLES

ताज्या बातम्या